घरताज्या घडामोडीपोट भरण्यासाठी कसरती करणाऱ्या आजीला गृहमंत्र्यांची १ लाखाची मदत!

पोट भरण्यासाठी कसरती करणाऱ्या आजीला गृहमंत्र्यांची १ लाखाची मदत!

Subscribe

पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आणि आजींना मदतीचा ओघही सुरू झाला. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आजी म्हणजे शांताबाई पवार यांची भेट घेतली आणि आजींना मदतही केली. अनिल देशमुख यांनी शांताबाई पवार यांना १ लाखाची मदत केली आहे.

आज गृहमंत्री पुण्यात होती यावेळी त्यांनी या आजींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी आजीकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द केला. या आजींचं वाय जास्त आहे. पण या संकटात त्या घराबाहेर पडून आपलं पोट भरतात. त्यामुळे आपच्या पक्षाकडून त्यांनी हवी ती मदत केली जाईल. असे यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -

गेले दोन दिवस सोशल मीडियावर लाठ्या- काठ्या खेळणाऱ्या आजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल अभिनेता रितेश देशमुख आणि पुण्याच्या आयुक्तांनीही घेतली. पण तुम्हाला माहितेय का त्या आजी कोण आहेत ते. या आजींच नाव आहे शांताबाई पवार. त्या ८५ वर्षांच्या आहेत. या कोरोना काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी या आजीला लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजींच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या ८५ वर्षीय आजी लाठी- काठीचा खेळ दाखवून पोट भरण्याची वेळ आली आहे. भर पावसात, उन्हात न थांबता पैशासाठी या आजींना हा खेळ खेळावा लागत आहे. या आजी हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत.


हे ही वाचा – ८५ व्या वर्षी लाठी-काठीचे खेळ करून पोट भरणाऱ्या ‘या’ आजी आहेत तरी कोण?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -