घरCORONA UPDATELockDown : साताऱ्यात जमावांकडून होमगार्डला मारहाण

LockDown : साताऱ्यात जमावांकडून होमगार्डला मारहाण

Subscribe

हल्ल्यात होमगार्ड जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बाजार येथील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे.

सातारा शहरातील सदरबाजारामध्ये बंदोबस्ताला असणाऱ्या होमगार्डवर जमावांनी हल्ला चढवला. जवळपास वीस जणांच्या जमावांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात होमगार्ड जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बाजार येथील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विश्वनाथ म्हमाने असं या जखमी होमगार्डचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी हनुमंत नाटेकर, अभिषेक गबाळे, सचिन शिंगटे, मल्लाप्पा सुतार यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हल्लेखोरांमध्ये महिलांचाही समावेश होता. लॉकडाऊनमुळे सदर बाजार परिसरात पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर बाजार परिसरात एक जण तोंडाला मास्क न लावता फिरत होता. त्यामुळे या होमगार्डने त्याला हटवले. त्यामुळे तरुण पळून गेला आणि पळत असतानाच पडला. त्यात तो जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात जमाव जमला आणि त्यांनी होमगार्डशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मात्र, हुज्जत घालण्यापेक्षा जखमी तरुणाला दवाखान्यात घेऊन जा, असे सांगण्याचा या होमगार्डने प्रयत्न केला असता या जमावाने होमगार्डला बेदम चोप दिला. त्यात होमगार्ड जबर जखमी झाला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमी होमगार्डला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, होमगार्डवर हल्ला होण्यापूर्वी या ठिकाणी दोनवेळा पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सर्व घटनांचा आढावा घेतला. तसेच या हल्ल्यातील संशयितांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -