घरमहाराष्ट्रनाशिक'दप्तर घ्या, बकर्‍या द्या' आंदोलनानंतर शाळा पुन्हा सुरू होण्याची आशा

‘दप्तर घ्या, बकर्‍या द्या’ आंदोलनानंतर शाळा पुन्हा सुरू होण्याची आशा

Subscribe

दरेवाडी (काळुस्ते) शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदसमोर आंदोलन

नाशिक : कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी (काळुस्ते) येथील शाळा महिन्याभरापासून बंद आहे. त्याच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी मंगळवारी (दि.11) शेळ्या घेवून येत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ‘दप्तर घ्या, बकर्‍या द्या’ अशा पध्दतीची मागणी करत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. अखेर ही शाळा बुधवारपासून नियमितपणे सुरु करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

भाम धरणामुळे बाधित झालेल्या दरेवाडीच्या 40 कुटुंबासाठी पहिली ते पाचवी शाळा सुरू असलेली शाळा शिक्षण विभागाने महिन्याभरापूर्वी बंद केली. येथील पालकांनी पंचायत समितीसमोर आंदोलनही केले. परंतु, त्यानंतर काही दिवस शाळा सुरु राहिली आणि 13 सप्टेंबर 2022 पासून पुन्हा बंद पडली. शाळेची पटसंख्या 43 असताना ही शाळा दुरुस्तीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी पालकांनी मंगळवारी दोन गाड्यांमध्ये विद्यार्थी, पालक व शेळ्या घेवून जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. त्यांनी प्रवेशद्वारावरच आंदोलन करत शाळा सुरु करण्याची मागणी केली. अखेर सीईओ मित्तल यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करत त्यांना शाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सीताराम गांवडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, सोमनाथ आगिवले, बाळू गावंडे, काळू गांवडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णा गावंडे, आनंद आगीवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे, यशोदा गावंडे, नथु सावंत, मथुरा भगत यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -