घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात अजित पवारांविरोधात फलकबाजी

नाशकात अजित पवारांविरोधात फलकबाजी

Subscribe

आक्षेपार्ह मजकूर आणि चित्र छापत भाजप नगरसेवकाने केला अजित पवार यांचा निषेध

गिरीश महाजन यांच्यावर ‘नाच्या’ या शब्दामध्ये टीका करणाऱ्या अजित पवार यांचा निषेध म्हणून नाशिक भाजप नगरसेवकाने आक्षेपार्ह मजकूर आणि चित्राचे होर्डिंग झळकावले आहे; त्यामुळे शहरात राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

blur इमेज
नाशकात अजित पवारांविरोधात फलकबाजी

अजित पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेमध्ये नाशिकमध्ये पूर परिस्थिती असताना जलसंपदा मंत्री ठेका धरतात आणि इतरांनाही ठेका धरण्यास प्रोत्साहन देत त्यांना ‘नाच्या’ असं नाव ठेवत टीका केली होती; या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरील प्रेमापोटी भाजप नगरसेवकाने तातडीने दक्षता दाखवत खालच्या अतिशय खालच्या पातळीच्या शब्दांचा प्रयोग करत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फलकबाजी केली. महिनाभरापासून नाशिकमध्ये होर्डिंग वॉर दिसून येत आहे. शिवसेना नगरसेवकाने मुख्यमंत्री शिवसेनेचाच संदर्भात शहर भाजप मुख्यालयासमोरच होर्डिंग झळकावल्याने वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी भाजप मध्ये सुरु असलेल्या भरती वर आक्षेप घेत भाजप विरोधात शहराच्या महत्वाच्या ठिकाणी होर्डिंग झळकावले होते. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच आज शहरात असे होर्डिंग लागल्याने शहरात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग वॉर सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -