घरठाणेHouses collapsed : डोंगरीपाडा परिसरात सहा घरे कोसळली 

Houses collapsed : डोंगरीपाडा परिसरात सहा घरे कोसळली 

Subscribe
ठाणे : ठाण्यातील डोंगरी पाडा, किंगकाँग नगर येथील ओम साई चाळीतील सहा घरे अचानक कोसळली. यामध्ये घरांचे नुकसान झाले. पण कुणालाही दुखापत झालेली नसल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने कळवण्यात आले.
शुक्रवारी रात्री १० वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई चाळ, साईबाबा मंदिर जवळ, किंग-काँग नगर, डोंगरी पाडा या ठिकाणी ओम साई चाळीतील एकूण सहा घरांचा काही भाग अचानक कोसळला. उर्वरित घरांचा भाग धोकादायक स्थितीत असल्याने या परिसरात काही घरे खाली करण्यात आली आहेत.
डोंगर परिसरात हि ओम साई चाळ असल्याने डोंगरावरील मातीचा भाग खचला. हि घटना घडली परंतु सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवित हानी दुर्घटना घडली नाही, ह्या चाळीच्या आजूबाजूचा परिसर धोकादायक झाला असल्याने बाजूची घरे देखील खाली करण्यात आली. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच अशी घटना घडल्याने झोपडपट्टीतील धोकादायक घरे यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ज्या ठिकाणी डोंगर परिसरात धोकादायक घरे असतील त्या ठिकाणी दुर्घटना होण्यापूर्वीच ठाणे महानगरपालिका विभागाने सतर्क होऊन धोकादायक घरातून नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवणे आवश्यक आहे. परंतु या चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीच स्वतःच्या नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे.
    ओमसाई चाळ मधील रूम क्रमांक – सी 64, मालक- मानसिक गौड, रूम क्रमांक-  सी 65 मालक: पौर्णिमा दास, रूम क्रमांक-  सी 66 मालक- हॅप्पी सिंग, रूम क्रमांक –  सी 67 मालक- रेणुका पुजारी, रूम क्रमांक-  सी 21 मालक- रामजी भांडवा, रुम क्रमांक-  सी 22 मालक- रामजी भांडवा यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे यांच्या घराची नुकसान भरपाई प्रशासन देईल का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.  धोकादायक घरे कोसळू लागल्याने आपत्ती विभागाने धोकादायक परिसराचा सर्वे करने देखील आवश्यक आहे.
————————————————————————————————
Edited by- Amol Kadam
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -