घरCORONA UPDATEकसा मिळणार दारू पिण्याचा परवाना?

कसा मिळणार दारू पिण्याचा परवाना?

Subscribe

एखाद्या व्यक्तीला दारु मागवायची असेल तर त्याला एफएल-एफ परवाना काढावा लागणार आहे. हा परवाना वाईन शॉप, बिअर शॉपवाल्यांकडूनच दिला जाणार आहे.

येत्या १४ मे पासून घरपोच दारु देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आला आहे. आता घरपोच दारूची डिलिव्हरी १४ ऐवजी १५ मेपासून सुरु करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे दारूचा पिण्याचा परवाना आहे, त्यांनाच केवळ ही दारू मागवता येणार आहे.

घरपोच दारू केवळ मद्य पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तींनाच देण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे हा परवाना नसेल तर तो दारु मागवू शकणार नाही. यासाठी वेगळी सोय उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. एखाद्या व्यक्तीला दारु मागवायची असेल तर त्याला एफएल-एफ परवाना काढावा लागणार आहे. हा परवाना वाईन शॉप, बिअर शॉपवाल्यांकडूनच दिला जाणार आहे.

- Advertisement -

दारु कशी मागवाल?

घरपोच दारु मिळणार हे समजल्यापासून तळीरामांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे, की दारू कशी मागवायची? यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, फोनचा वापर करता येणार आहे. दुकानदार त्यांच्या दुकानाबाहेर ठळक अक्षरात त्यांचा संपर्क क्रमांक लिहिणार आहेत. याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जो वेळ दिला असेल त्याच वेळेत मद्य विकता येणार आहे. ग्राहकाला एमआरपीनेच मद्याची विक्री करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये दारु घरपोच मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -