घरमहाराष्ट्रपतीने मध्यरात्री तोडले पत्नीचे दात; कारण ऐकून हैराण व्हाल

पतीने मध्यरात्री तोडले पत्नीचे दात; कारण ऐकून हैराण व्हाल

Subscribe

सोलापूरच्या बार्शी येथे एका नवऱ्यावर पत्नीला मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाणीचे कारण वेगळेच आहे.

रागाच्या भरात माणूस काय करेल याचा काही पत्ता नाही. रागाच्या भरातच माणसाच्या हातून नकळत गुन्हे घडतात, त्यानंतर माणसावर पश्चाताप करण्याची वेळ येते. बार्शी येथे एका पतीने रागाच्या भरात चक्क आपल्या बायकोचे दात तोडले आहेत. मात्र त्याच्या रागाचे कारण तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाल. मानिक गायकवाड असे या पतीचे नाव आहे. गायकवाड यांचे मुल मध्यरात्री झोपेतून उठून रडायला लागले. “मानिक यांनी आपल्या पत्नीला मुलाला गप्प करण्यास सांगितले. मात्र बायकोने मुलाला उचलून घेऊन त्याला गप्प करण्यास नकार दिला आणि मानिक यांचा संतापाचा तोल सुटला.”

वाचा – ऑस्ट्रेलियन कॉमेंटटेरने या भारतीय फलंदाजाचा केला अपमान

ही घटना २२ डिसेंबर रोजी घडली असल्याची माहिती मिळत आहे. सुवर्णा आणि मानिक गायकवाड यांचा मुलगा मध्यरात्री उठून रडायला लागला. मानिक यांनी आपल्या पत्नीला मुलाला शांत करण्यास सांगितले. मात्र पत्नीने यासाठी नकार दिला. त्यानंतर मानिकने आपल्या पत्नीला जबर मारहाण करायला सुरुवात केली. मानिक इतका संतापला होता की, त्याने पत्नीला दगडाने मारले. या हल्ल्यात पत्नी सुवर्णाचे दात तुटले.

- Advertisement -

हे देखील वाचा – शर्मिला ठाकरेंचा चावा घेतलेल्या राज यांच्या कुत्र्याचे निधन

दरम्यान रात्री गोंधळ उडाल्यामुळे शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. सुवर्णानेही आपल्या भावाला तातडीने बोलावले. त्यानंतर बार्शी शहरातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या घटनेनंतर सुवर्णाच्या माहेरच्यांनी माणिकच्या विरोधात बार्शी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा – कोरेगाव भीमा परिसरावर ड्रोनची नजर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -