घरमहाराष्ट्रटोल नाक्यावर हायब्रिड लेन

टोल नाक्यावर हायब्रिड लेन

Subscribe

लेन चुकलेल्यांना महाराष्ट्रात दंड नाही

टोल नाक्यावर फास्ट टग असलेल्या रांगेत शिरणार्या वाहनांना कोणताही दंड न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्राच्या टोल नाक्यांवर हायब्रिड मॉडेल राबविण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकार्याने सांगितले. फास्ट तसेच रोख असे दोन्ही पर्याय या हायब्रिडच्या पर्यायात उपलब्ध असतील. केंद्र सरकारच्या नियमानुसार फास्ट टग असलेल्या रांगेत शिरणार्या वाहनांना दंड आकारणे अपेक्षित आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर एमएसआरडीसीने फास्ट टग लावले आहेत. पण फास्ट टग यंत्रणेत अनेक दोष आढळून आले आहेत. अनेक वाहनचालकांनी छोट्या वाहनांचे फास्ट टग खरेदी केले असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही प्रकरणात वाहन चालकाने फास्ट टगमध्ये रिफील केले नाही असे आढळून आले आहे. तर काही प्रकरणात वाहनांचे फास्ट टग स्कन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे असे दोष असलेल्या प्रकरणात ही वाहने ब्लकलिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत. या वाहनचालकांच्या फास्ट टग अकाऊंटमधून बँकेमार्फत तत्काळ वसुली करण्यात येणार आहे. तसेच ज्या मोठ्या वाहनांनी छोट्या वाहनाचे फास्ट टग खरेदी केले आहेत अशा वाहनांचे फास्टटगही बदलण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मोफत प्रवासाचा नियम नाहीच

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर तसेच राज्यात काही ठिकाणी सुरू झालेल्या फास्ट टग यंत्रणेत अनेक दोष आढळून आले आहेत. त्यामुळे सोशल मिडिया वापरकर्त्यांकडून अनेक मसेज व्हायरल करण्यात आले आहेत. या मसेजमध्ये फास्ट टग यंत्रणेत दोष आढळून आल्यास मोफत प्रवास मिळणार असल्याचा नियम सांगण्यात आला आहे. पण असा कोणताही नियम अस्तित्वात नाही किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत असे एमएसआरडीसी तसेच बँकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -