घरताज्या घडामोडीमातोश्रीवर जायला मला कमीपणा वाटत नाही - शरद पवार

मातोश्रीवर जायला मला कमीपणा वाटत नाही – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात मात्र मुख्यमंत्री स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर आज शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मला मातोश्रीवर जायला कमी पणा वाटत नाही, असे पवार म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्याचीही टीका विरोधकांकडून होत आहे. यावरही पवारांनी मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली.

शरद पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात अनेक लोक घराबाहेर पडत नाहीत. महत्त्वाचे लोक जर बाहेर पडले तर अनेक लोक जमा होतात. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा धोका वाढत असतो. काही संवाद करायचा असेल तर आज संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे घराबाहेरच पडले पाहीजे, असे काही नाही. मुख्यमंत्री कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दिवसाला १५ – १५ बैठका घेत आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री निष्क्रीय असल्याबाबतही विरोधकांनी टीका केली होती. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर राज्याला गती देण्याचे काम केले होते. मात्र कोरोना आल्यामुळे त्यांच्या कामाला ब्रेक लागला. आज सर्व यंत्रणा कोरोनाच्या कामाला लागली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -