घरताज्या घडामोडीशरद पवारांसह उद्धव ठाकरेही मतदारसंघात येतील, मला चिंता नाही; आ. कोकटेंचे वक्तव्य

शरद पवारांसह उद्धव ठाकरेही मतदारसंघात येतील, मला चिंता नाही; आ. कोकटेंचे वक्तव्य

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वच सहा आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत त्यांची मते जाणून घेतली. या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तसेच सिन्नर तालुक्यातील जनतेने माझा निर्णय योग्य असल्याचे म्हंटले आहे. तसेच येणाऱ्या काळात शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरेही माझ्या मतदारसंघात प्रचारासाठी येतील. मात्र मी त्याची चिंता करत नाही असा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे.

मागील रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपत घेत आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना – भाजपा सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण सहा आमदार आहेत. त्या सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक मुख्य चेहरा असलेले सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (दि. ९) सिन्नर मध्ये दाखल होत सुसंवाद मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपली भूमिका सांगतांनाच कार्यकर्ते तसेच तालुक्यातील जनतेची मते जाणून घेतली. याबाबत माहिती देतांना कोकाटे म्हणले की मी विकासात्मक राजकारण करणारा व्यक्ति आहे. मी भावनेच्या जोरावर कधीही राजकारण करत नाही. त्याचमुळे मी घेतलेला निर्णय योग्य असल्याची भूमिका जनतेनेही मांडली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, शरद पवार यांनी नुकताच नाशिक जिल्ह्यात आणि विशेषतः येवल्याचा दौरा केला. आगामी काळात ते अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या इतरही आमदारांच्या मतदारसंघात दौरा करतील असे बोलले जात आहे. याबाबत बोलताना आमदार कोकाटे म्हणाले की माझ्या मतदार संघात पवार साहेब येतील तसा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि लोकशाहीत त्यांना तो अधिकारही आहे. आणि शरद पवारच काय उद्धव ठाकरे हे देखील आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणाऱ्या काळात सिन्नर मतदारसंघात येतील. मात्र, मी त्याची जास्त चिंता करत नाही. मी विकासात्मक राजकारण करत आलोय, यापुढेही करत राहील. त्यामुळे कोणीही आले तरी तालुक्यातील जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. आस आत्मविश्वास आ. कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.

मी आणि दादा वर्कहोलिक 

अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबाबत बोलताना आ. कोकाटे म्हणाले की अजित पवार हे विकासात्मक दृष्टिकोन असलेले तसेच सतत कामात व्यस्त असलेले वर्कहोलिक व्यक्ति आहेत. त्याच सोबत एकदा एखादा निणे घेतला तर त्याबाबत कुठली भीती किंवा शंका बाळगणे हे दादांच्या स्वभावात नाही. आणि माझ्याही स्वभाव तसाच रोखठोक आहे. त्यामुळे दादा आणि माझ्या स्वभावतील या साम्यमुळे आमचे संबंध अधिक घट्ट झाले आणि त्याचमुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

भुजबळांशी मतमतांतर मात्र,…

मागील काही वर्षात नाशिक जिल्ह्यातील राजकारणात छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात मोठा संघर्ष झालेला आहे. कोकाटे कॉंग्रेस पक्षात असतांना तर त्यांनी जाहीर रित्या भुजबळ यांच्यावर शरसंधान सांधले होते. तसेच कोकाटे राष्ट्रवादीत आल्यानंतर देखील हे दोन्ही नेते एकमेकांपासून अंतर ठेऊन होते. याबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, भुजबळ यांच्यासोबत मतमतांतरे असली तरीही ते कधीही विकासाच्या मुद्द्यावर प्रतारणा करत नाहीत. तसेच आज राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र आहोत त्यामुळे आम्ही एकच आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -