घरमहाराष्ट्रनाना 'तसला' माणूस नाही; राज ठाकरेंनी केली नानाची पाठराखण

नाना ‘तसला’ माणूस नाही; राज ठाकरेंनी केली नानाची पाठराखण

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता नाना पाटेकरांना तनुश्री दत्ता प्रकरणात निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मी नानाला ओळखतो, तो त्यातला नाही, असे म्हणत त्यांनी नानाला पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता नाना पाटेकरांना तनुश्री दत्ता प्रकरणात निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. देशात सुरु असलेल्या मीटू मोहिमेला मनसेचा विरोध असून अशा घटना घडल्यास महिलांनी नक्कीच मनसेकडे यावं, असे राज ठाकरे म्हणाले असून त्या महिलांना न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कालपासून राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर गेले असून अमरावतीमध्ये असताना त्यांनी मीटू मोहिमेवर भाष्य केले. तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला असून मी नानाला ओळखतो, नाना त्यातला नाही, असे मत यावेळी राज ठाकरे यांनी मांडले. शिवाय अत्याचार झाल्यास तो सांगावा, परंतू १० वर्षानंतर का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वाचा : नाना पाटेकरांची नार्को टेस्ट करा- तनुश्री दत्ता

- Advertisement -

मीटूला पाठिंबा पण १० वर्षांनी का?

गेल्या काही महिन्यांपासून देशात मीटू मोहिमेच वादळ आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने दहा वर्षांपूर्वी घटलेल्या घटनेचा उल्लेख करत नाना पाटेकरांवर छेडछाडीचा आरोप लावला. हे प्रकरण आता पोलीसात आणि कोर्टातही गेलं आहे. यामध्ये तिने मनसेचाही उल्लेख केला असून त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकावल्याचे म्हटले होते. राज ठाकरे यांच्यावरही तिने टीका केली होती. अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन सोडले असून नाना पाटेकरांना पाठिंबा दर्शवला आहे.

वाचा : सरकारला ब्लॅकमेल करण्याशिवाय शिवसेनेनं काय केलंय? –राज ठाकरे

- Advertisement -

महिलांचा मान राखलाच पाहिजे 

दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मीटू मोहिमेबाबत विचारणा केली असताना त्यांनी हे भाष्य केले. ‘नाना पाटेकर उद्धट आहे, कधी कधी मूर्खपणा करतो, पण नाना असं काही करेल असं मला वाटत नाही’, अशा शब्दांत राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची पाठराखण केली आहे. मात्र, असं बोलताना ‘महिलांचा मान हा राखला गेलाच पाहिजे’, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -