घरट्रेंडिंगनाना पाटेकरांची नार्को टेस्ट करा- तनुश्री दत्ता

नाना पाटेकरांची नार्को टेस्ट करा- तनुश्री दत्ता

Subscribe

तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीचा अर्ज केला आहे. नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी तनुश्री दत्ताने केली आहे. यासंदर्भात तनुश्रीने आज ओशिवरा पोलिसांना अर्ज केला आहे. दरम्यान ओशिवरा पोलिसांनी या दोघांचा जवाब नोंदवला आहे. यावर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांनी सांगितले आहे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पोलीस नार्को टेस्ट करु शकणार आहे. तनुश्रीने आज वकिलाच्या माध्यामातून ही मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आरोपाला या मागणीने एक नवीन वळण लागले आहे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये #metoo मोहीमेअंतर्गत कलाकारांवर आरोप होत आहेत.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -