घरताज्या घडामोडी"गैरव्यवहार आढळून आल्यास राजकीय संन्यास घेईन" गिरणा अ‍ॅग्रो प्रकरणी दादा भुसेंचे खा.संजय...

“गैरव्यवहार आढळून आल्यास राजकीय संन्यास घेईन” गिरणा अ‍ॅग्रो प्रकरणी दादा भुसेंचे खा.संजय राउतांना आव्हान

Subscribe

नाशिक : गिरणा अ‍ॅग्रो कंपनीत एक नया पैश्याचाही गैरव्यहार केल्याचे आढळून आल्यास मंत्री पदाचाच काय आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन. असे खुले आव्हान शिंदे गटाचे मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे. लवकरच गिरणा अ‍ॅग्रोच्या सभासदांची बैठक बोलावण्यात येणार असून टिवटिव करणार्‍यांनाही या बैठकीला आमंत्रण देण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले.

नाशिक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना पालकमंत्री भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला समर्थन दिले. भुसे यांनी गिरणा अ‍ॅग्रो नावाने कंपनी स्थापन करून सुमारे १७८ कोटी रूपयांचे शेअर्स जमा केले. मात्र कंपनीच्या संकेतस्थळावर मात्र १ कोटी ७८ लाख रूपयांचेच शेअर्स दाखविण्यात आल्याचा आरोप करत याबाबत लवकरच स्फोट करणार असल्याचा दावा केला होता. याबाबत बोलतांना भुसे म्हणाले, माझ्यावर आरोप करणारयांनी मालेगावच्या सभेत याबाबत एक शब्दही का काढला नाही? गिरणा कारखाना हा सर्वात जुना आहे. १९९८ मध्ये तो बंद पडला तेव्हा मी राजकारणातही नव्हतो. ज्या बँकांनी कारखान्याला कर्ज दिले त्यांनी डीआरटी कोर्टात धाव घेतली.

- Advertisement -

डीआरटी कोर्टाने कारखाना विक्री करून बँकांचे पैसे देण्याचे आदेश काढले. तीन वेळा या बँकेच्या विक्रीची निविदा प्रसिध्द करण्यात आली. तिसर्‍यांदा २७.५० कोटींची निविदा काढण्यात आली. त्यावेळी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन हा कारखाना टिकला पाहिजे या भावनेतून गावोगावी सभा घेतल्या. मी स्वतः महिनाभर ७० गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या. त्यावेळी ११ हजार शेतकर्‍यांकडून ११०० रूपयांप्रमाणे शेअर्स विक्री करून निधी संकलित करण्यात आला मात्र केवळ १ कोटी ७० लाखांचा निधी संकलित झाला. कारखाना खरेदी करण्यासाठी लागणार्‍या निधीपेक्षा हा निधी कमी असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत हा कारखाना वाचविण्यासाठी विनंती केली. भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना घेण्यात आला.

गिरणा कंपनीने आर्मस्ट्राँगला १.७० कोटी रूपयांची रक्कम आरटीजीएस केले. कंपनीच्या ऑडीट रिपोर्टमध्ये याबाबतचे सर्व पुरावे आहेत. मुळातच जर शेतकर्‍यांच्या माध्यमातून १.७० कोटी रूपये जमा झालेले असतांना १७८ कोटी आले कुठून ? कदाचित संजय राऊत यांना मोठया आकडयांची सवय असल्याने त्यांना पॉईंट दिसला नसावा असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या सभासदांकडून शेअर्स गोळा करण्यात आले त्यांची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत चौकशीसाठी मी तयार असल्याचे सांगत जर आरोप सिध्द झाले तर मी राजकीय संन्यास घेईल आणि जर यात कोणतेही तथ्य आढळले नाही तर टिवटिव करणार्‍यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान भुसे यांनी राऊत यांचे नाव घेत दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -