Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'संजय राऊत पुण्यात येणार, अडवून दाखवा; शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु'

‘संजय राऊत पुण्यात येणार, अडवून दाखवा; शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु’

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत पुण्यात त्यांना फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. यावर आता शिवसेनेने देखील भाजपला आव्हान दिलं आहे. संजय राऊत पुण्यात येणार असून त्यांना अडवल्यास शिवसेना स्टाईलने भाजपचं स्वागत करु, असा इशारा शहर शिवसेनेच्यावतिने देण्यात आला आहे.

शिवसैनिकांच्या आग्रहखातर गणेशोत्सवासाठी संजय राऊत पुढील आठवड्यात पुण्यात येणार आहेत. त्यांना जर भाजपने अडवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असं शिवसेनेने म्हटलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसंच, राऊत यांनी माफी मागावी अन्यथा शहरात फिरकू देणार नाहीस असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता.

- Advertisement -

दरम्यान, यावर शिवसेनेने भाजपला थेट आव्हान देत इशाराच दिला आहे. मुळीक यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे. मुळीक यांनी आधी शहराची हद्द जाणून घ्यावी मग स्वत:च्या हद्दीत राहून स्वत:च्या पायावर आधी उभं रहावं, असा टोला शिवसेनेने लगावला.

संजय राऊत यांना शिवसैनिकांनी पुण्यात येण्याचं निमंत्रण देण्यात आलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे. त्यांना कुणी अडवून दाखवावं, असं आव्हान शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिलं. तर गजानन थरकुडे यांनी राऊत यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचे स्वागत शिवसेना स्टाईलने केलं जाईल, अशा शब्दात इशारा दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -