घरताज्या घडामोडीCoronaVirus: बाळंतीणसाठी खास सुविधा; 'या' हेल्पलाईनवर करा फोन

CoronaVirus: बाळंतीणसाठी खास सुविधा; ‘या’ हेल्पलाईनवर करा फोन

Subscribe

कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लोकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात अडकले आहेत. त्यामुळे सध्या घरात असलेल्या स्तनदा माता आणि बालकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयआयटी मुंबईकडून विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००-२६७-७७८२ हा टोल फ्री क्रमांक महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच जनजीवन ठप्प झाले असताना अनेक डॉक्टरांचे दवाखानेही बंद आहेत. त्यामुळे स्तनदा मातांना बाळाचे पोषण, त्याचे आहार त्याला स्तनपान करण्याबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र डॉक्टरांचे दवाखाने बंद असल्याने त्यांना सल्ला विचारण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईकडून ‘माँ और शिशु पोषण’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे.

ही हेल्पलाईन ‘या’ चार भाषांमध्ये सुरू 

त्यासाठी १८००-२६७-७७८२ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावरून महिलांना डॉक्टर, आहारतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करता येणार आहे. ही हेल्पलाईन हिंदी, मराठी, तामिळ, गुजराथी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनसाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाकडून आणि व्हील फाऊंडेशनकडून निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील युवा इंजिनियरची कामगिरी; कमी किंमतीच्या व्हेंटिलेटर्सची हेणार निर्मिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -