घरताज्या घडामोडीराज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, पुढचे ३ दिवस महत्त्वाचे!

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, पुढचे ३ दिवस महत्त्वाचे!

Subscribe

गेल्या आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस झाला. आत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा १० ते १३ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पासाच्या हलक्या सरी बरसतील असं सांगण्यात आलं आहे. किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईत ४ ते ६ ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्यानं स्थिती पूर्ववत होण्यास मदत झाली. ५ ऑगस्टला झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांची दाणादाण उडाली. आता पुन्हा एकदा पुढचे तीन दिवस राज्यात विदर्भ आणि कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हे ही वाचा – ‘असं कधी घडलच नाही, राऊत खोटं बोलतायत’; सुशांतच्या मामाने केला आरोप!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -