घरमहाराष्ट्रलॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला 'डफली बजाव' आंदोलन

लॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन

Subscribe

राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरु झाल्याच पाहिजे, वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या

राज्यातील वाढत्या लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. येत्या १२ ऑगस्टला लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारला जाग येण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डफली वाजवून आंदोलन करणार आहे. याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन वाढवला तर रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला होता.

केंद्रसह राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नाहीत. शिवाय, काहीच सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवून निषेध केला जाणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजवून निषेध केला जाणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचं महत्व सांगावं, शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.


हेही वाचा – सचिन पायलट गटाचे परतीचे मार्ग बंद करा; काँग्रेस आमदारांची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -