घरCORONA UPDATECorona: केतकीपाड्यातील 'त्या' संशयितांना क्वारंटाईन करा - स्थानिक

Corona: केतकीपाड्यातील ‘त्या’ संशयितांना क्वारंटाईन करा – स्थानिक

Subscribe

दहिसरमध्ये सध्या तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून केतकीपाडा येथेही आता संशयित कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दहिसरमध्ये सध्या तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून केतकीपाडा येथेही आता संशयित कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहिसरमधील शैलेंद्र नगर व वाल्मिकी नगर पाठोपाठ केतकीपाडा येथेही संशयित रुग्ण आढळून आल्याने त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे. परंतु हा परिसर दाटीवाटीचा झोपडपट्टीचा असल्यामुळे येथील संशयित कोरोनाग्रस्तांना शैलेंद्र नगर येथे बंद स्थितीत पडलेल्या रिकामी इमारतीत अथवा निवारा केंद्रात रवानगी केली जावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याकडे केली आहे.

दहिसरमधील केतकीपाड्यामधील पडवळ चाळ लताबाई पीयेशी याठिकाणी १ एप्रिल रोजी करोनाचा संशयित रुग्ण आढळून आला. त्यामुळे त्या रुग्णाला त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन केले आहे. दोन दिवसांपूवी हातावर स्टॅम्प असलेली महिला खरेदीसाठी बाहेर आली होती. मात्र, त्यांच्या हातावरील स्टॅप लक्षात आल्यानंतर नागरिकांना त्यांना हटकून पुन्हा घरी पाठवून दिले. केतकीपाडा हा परिसरात लोक दाटीवाटीने चाळीत राहत असून त्यांची घरे छोटी आहे. एका घरात पाच ते सात लोक राहत आहेत. तसेच पाण्याचे नळ व शौचालय हे सार्वजनिक असल्यामुळे या संशयित रुग्णाच्या बाहेरील वावरामुळे आजुबाजुच्या रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येवू शकते, अशी भीती नगरसेवक ब्रीद यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे केतकीपाडा येथील संशयित कोरोनाग्रस्तांसाठी याठिकाणी असलेल्या सरकारी इमारत किंवा रिकामी खाजगी इमारती अथवा शैलेंद्र नगर म्हाडा कॉलनी याठिकाणी रिकाम्या असलेल्या बेवारस निवारा केंद्रात क्वारंटाईन करून तिथे करावी,अशी सूचना त्यांनी केली आहेत. तसेच केतकीपाडा परिसरात सॅनिटायझर फवारणी रोजच्या रोज करून नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घ्यावी, अशीही सुचना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -