घरताज्या घडामोडीमाटुंग्यातील झोपडपट्टीतील लोकांची 'स्वयंशिस्त'

माटुंग्यातील झोपडपट्टीतील लोकांची ‘स्वयंशिस्त’

Subscribe

माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील कमला रामन नगर वसाहत झोपडपट्टीतील रहिवाशांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत करोनाचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झोपडपट्टी, चाळी परिसरांमध्ये झपाट्याने पसरण्याची भीती एका बाजुला व्यक्त केली जात असताना माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील कमला रामन नगर वसाहत झोपडपट्टीतील रहिवाशांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत करोनाचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. या झोपडपट्टीतील रहिवाशांनी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत रहिवाशांना आत-बाहेर जाण्यास मुभा दिली असून बाकीच्या वेळेत प्रत्येक रहिवाशांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. याचेही तंतोतंत पालन केले जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टी आणि चाळींमध्ये रहिवाशांनी स्वयंशिस्त लावल्यास कोरोनाचा धोका टाळण महापालिकेला आणि पर्यायाने सरकारने शक्य होणार आहे.

कुणालाही आत किंवा बाहेर प्रवेश नाही

मागील चार दिवसांमध्ये प्रभादेवी येथील चाळ, धारावी आणि त्यानंतर वरळी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या झोपडपट्टी परिसरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील कोरोना विषाणूचा संसर्ग झोपडपट्टी परिसरांमध्ये पसरण्यापासून रोखणे हे आता महापालिकेसह सरकारपुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व झोपडपट्टी आणि चाळी परिसरांमध्ये करोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपणच आपले रक्षक असे ब्रीद वाक्य दिले आहे. या ब्रीद वाक्याचे पालन आता माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे अधिकारी वसाहतील शेजारील कमला रामन नगर वसाहतील रहिवाशांनी स्वत:च शिस्त लावून घेत भाजी आणि इतर जीवनावश्यक सामान आणण्यासाठी कधी बाहेर जायचे आणि कधी घरी राहायचे याचे वेळापत्रक ठरवून दिले आहे.

- Advertisement -

ठराविक वेळेतच घराबाहेर पडा आणि घरातच बसा

सुमारे साडेतीनश कुटुंब असलेल्या या झोपडपट्टीत श्री मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, वरदान मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ आणि वारकरी सांप्रदाय मंडळ आदी पाच मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ८ याच वेळेत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या वेळेव्यतिरिक्त कुणीही बाहेर जाणार नाही आणि कुणीही आत येणार नाही याची खबरदारी घेत प्रत्येकाला घरीच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे यासाठी रहिवाशांनी प्रवेशद्वारच बंद केले आहे. या प्रवेशद्वारावर पाचही मंडळांच्या प्रत्येकी चार ते पाच कार्यकर्ते यांना तैनात करून कुणालाही बाहेर जायला दिले जात नाही. तसेच बाहेर जाणाऱ्या एका व्यक्तीने एका वेळी चार ते पाच जणांचे किराणा सामान आणायचे अशी जबाबदारी टाकून कमीत कमी लोक झोपडपट्टी बाहेर जातील याचीही काळजी घेतली आहे.

तसेच येथील रहिवाशांच्या मते, आज धारावीपर्यंत हा विषाणूचा संसर्ग झाला आहे. धारावीतील अनेक फेरीवाले तसेच लोक याच रस्त्यांने ये- जा करत असतात. त्यामुळे आपली झोपडपट्टी सुरक्षित ठेवून रहिवाशांना निरोगी ठेवण्यासाठी येथील रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पोलीस आणि महापालिका व्यक्तीरिक्त कुणालाही या रस्त्यांवरुन प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आज आम्ही काळजी घेतली तर आम्ही कोरोनाचे संकट आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी काळजी प्रत्येक झोपडपट्टी आणि चाळींनी घेतल्यास हे संकट मुंबईतून दूर करणे अशक्य नाही, असेही येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले दिवे लावण्यास, त्यावर सेलिब्रेटी म्हणतात…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -