घरमहाराष्ट्रसाखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकरची छापेमारी; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकरची छापेमारी; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी सात वाजल्यापासून साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, नगरमधील अंबालिका आणि नंदूरबारमधील पुष्पदंतेश्वर या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर आज आयकर विभागाने या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकले आहेत. यामुळे या कारवायांना राजकीय संबंध आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. कारण ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांवर छापे मारण्यात आले आहेत, ते सर्व अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या कारवाईने अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी काल जरंडेश्वर कारखान्याला भेट देत अजित पवार यांना थेट आव्हान दिलं होतं. तुमच्यात हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण हे जाहीर करा असं आव्हान सोमय्या यांनी अजित पवार यांना दिलं. बेनामी कंपन्यांमधून गैरव्यवहार करुन हा कारखाना ताब्यात घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. जरंडेश्वर हा कारखाना अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाटगे यांचा आहे.

भाजपचे पण कारखाने आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी

अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत, त्यापैकी एकावर पण कारवाई नाही. आधी कारवाई करायची, मीडियात मोठी प्रसिद्ध द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो, मी या कारवाईचे उत्तम उदाहरण असल्याचं भुजबळ म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -