घरमहाराष्ट्रभारताला विभाजीत केले जाऊ शकत नाही - राहुल गांधी

भारताला विभाजीत केले जाऊ शकत नाही – राहुल गांधी

Subscribe

हिंगोली – भारताला विभाजीत केले जाऊ शकत नाही आणि आम्ही या देशात द्वेष पसरू देणार नाही, असे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर रविवारी निशाणा साधला. राहुल गांधी हिंगोलीतील कळमनुरी येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. सोबतच कलाकारांसोबत ढोल वाजवण्याचाही आनंद लुटला.

कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. गेल्या ६६ दिवसांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास अखंडपणे सुरू आहे, मात्र रविवारी राहुल गांधी आणि इतर यात्रेकरूंनी विश्रांती घेतली. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून वाशिमकडे निघणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -