घरमहाराष्ट्रक्षय रोगामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक

क्षय रोगामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक

Subscribe

क्षय रोगामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यावर काहीतरी ठोस उपाय करणं म्हत्त्वाच आहे. तसेच या रोगाबाबत जागृती होणं फार गरजेचं आहे.

क्षयरोगाबाबत समाजात आजही मोकळेपणे बोलले जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जगात दर मिनिटाला क्षय रोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर देशाने सर्वोच्च प्रमाण नोंदवले आहे. त्यामुळे क्षय रोगाबाबत जागृती मोहीम हाती घेणं हाच यावरील उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याचंच एक पुढचं पाऊल म्हणून डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने या रोगाच्या जागृतीसाठी व्हीडिओ मोहीम सुरू केली आहे.

काय आहे व्हिडिओ मोहीम?

इंडियन मेडिकल असोसिएशन विज्ञाननिष्ठ उपचारातील डॉक्टरांची राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना आहे. ‘युनाइट टू एंड टीबी’ या मोहिमेत व्हिडिओंचा समावेश असून हे व्हिडिओ क्षय रोगाने कोणतीही व्यक्ती दगावू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय देण्यात आले आहेत. तसेच यात रुग्ण, कुटुंबिय आणि डॉक्टर यांना माहिती दिली जाणार आहे. डॉक्टरांनी टीबीच्या प्रत्येक रुग्णाची नोंद तातडीने करावी, याची दक्षता घेणाऱ्या वेब आधारित मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे नोंदवण्याची आवश्यकताही या व्हीडिओंद्वारे स्पष्ट केली जाणार आहे.

डॉक्टर आणि रुग्ण यांनी या घातक आजाराकडे गांभीर्याने पाहावे, हे या कॅम्पेनमागील उद्दिष्ट आहे. टीबी संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन उपाय करणे गरजेचे आहे. व्हीडिओ कॅम्पेनचा प्रसार करण्यासाठी आम्ही डॉक्टर, रुग्ण, रुग्णालये, आरोग्य संस्था, सरकारी यंत्रणा आणि विविध सोशल मीडिया पर्यंत पोहोचणार आहोत. युनाइट टू एंड टीबी हे कॅम्पेन २०२५ पर्यंत टीबी संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या उद्देशाशी जोडलं गेलं आहे.
– डॉ. आर. व्ही. अशोकन, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -