घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउद्योग बंदचा निर्णय मागे; "ही" आहे उदय समंतांची प्रतिक्रिया

उद्योग बंदचा निर्णय मागे; “ही” आहे उदय समंतांची प्रतिक्रिया

Subscribe

नवीन नाशिक : जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवत काळ्या फिती आणि काळी मुखपट्टी लावून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा घेण्यात आलेला निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमा कार्यालयात गुरुवारी (दि.१) रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बेळे यांनी बंदला पांठिबा देणार्‍या उद्योजकांचे आभार मानले. त्यांनी बंदबाबत उद्योजकांची जी मागणी असून, त्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयी चर्चा झाली असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणातील १९ दोषींची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले.
या घटनेबाबत उद्योगमंत्री, पालकमंत्री, माजी पालकमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस, शहराध्यक्ष, अनेक पदाधिकार्‍यांनी विचारपूस करून माहिती घेत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. उद्योजकांनी बंद मागे घ्यावा अशी मागणीही केली. या सर्व पार्श्वभूमीवर बंद मागे घेतला जावा अशी मागणी बेळे यांनी सुकाणू समितीला केली असता, समितीचे ज्ञानेश्वर गोपाळे यांनी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी उद्योजकांच्या सुकाणू समितीतील पदाधिकारी डी.जी. जोशी, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, वरुण तलवार, राजेद्र जोशी, किशोर राठी उपस्थित होते.

उद्योगमंत्र्यांसोबत बैठक
७ किंवा ८ जून रोजी मंत्रालयात उद्योगमंत्र्यांसोबत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यास बेळे यांच्यासह सुकाणू समितीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत हल्लाप्रकरणी चर्चा केली जाणार असून, दोषींवर कारवाई व्हावी, ही उद्योजकांची मागणी कायम असणार आहे.

- Advertisement -

उद्योजकांनी दिलेल्या पांठिब्याबद्दल सदैव ऋणी आहे. उद्योग वाढावा ही आमची भूमिका असून, ती कायम असणार आहे. उद्योगमंत्र्यांसह पालकमंत्री व अन्य नेत्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देताना बंद मागे घेण्यास सांगितले.
– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -