घरमहाराष्ट्रमहागाई यूपीए सरकारची डार्लिंग

महागाई यूपीए सरकारची डार्लिंग

Subscribe

नाना पटोले यांची महागाईवरून केंद्र सरकारवर जहरी टीका

केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेची दिशा भूल करून फक्त दोन- चार उदयॊगपतींसाठीच काम करत आहे.मोदी सरकार सामान्य जनतेला चिटकलेला जळू असून जळू प्रमाणे सर्व सामान्य नागरिकांचे महागाईने रक्तशोषण करत आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्राने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अशी जहरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
वाढत्या महागाईवरून नाना पटोले केंद्रसरकारवर आक्रमक झाल्याचे दिसून आले मोदी सरकारने जानेवारीपासून दरवाढ करत गॅस सिलेंडर १९० रुपयांनी महाग केले .आहे.युपीए सरकारवेळी ४४० रुपये असणारा गॅस आता 900 रुपयांपर्यंत पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त मोजक्याच उद्योगपती मित्रांचे हित जोपासत आहेत. गेल्या केंद्र सरकारने ८ महिन्यात ६७ वेळा इंधन दरवाढ करून .पेट्रोलचे दर १०७ रुपये,तर डिझेल दर ९६ रुपये लिटर केले आहे.
गॅसच्या किंमतीही सतत वाढवत इंधनावरील कर रुपाने केंद्राने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी केली असून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. तसेच . यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भाजपला हि जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे’. असं वक्तव्य देखील पटोले यांनी केल केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांचे सरकार असताना इंधन आणि गॅसवर सबसिडीच्या रुपाने सर्वसामान्य जनतेला मदत दिली जात होती याने महागाईची झळ सर्व सामान्य जनतेला पोहचत नव्हती असे देखील पटोले म्हणाले

 

- Advertisement -

 

- Advertisement -

 

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -