घरठाणेविकास आराखड्यानुसार न केलेल्या कामांची चौकशी करा

विकास आराखड्यानुसार न केलेल्या कामांची चौकशी करा

Subscribe

दक्ष नागरिकांची मागणी

भिवंडी । भिवंडी महानगर क्षेत्रात पालिकेकडून गेल्या वीस वर्षांपासून नव्याने बांधण्यात येणारी गटारे आणि आणि फुटपाथ हे विकास आराखड्यानुसार बांधले जात नसल्याने शहराच्या विकासाला बाधा येत आहे. यातून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याने गेल्या वीस वर्षांमध्ये विकास आराखड्यानुसार न बांधलेल्या गटारे आणि स्वच्छतागृहांची चौकशी करण्याची मागणी दक्ष नागरिकांकडून केली जात आहे.

शहरात नवीन बांधकाम, दुरुस्तीचे बांधकाम अथवा दुरुस्तीचे सुधारित बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी पालिकेच्या नगरविकास विभागातून दिली जाते. मात्र महापालिकेच्या अनेक बांधकामासाठी अथवा दुरुस्तीसाठी नगररचना विभागाकडून अभिप्राय अथवा परवानगी घेतली जात नाही,असे दिसून आले आहे. गेल्या 20-30 वर्षांपासून महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी प्रामुख्याने शहर विकासाची कामे करताना शहरात नव्याने वारंवार गटारे आणि त्यावर फुटपाथ बांधण्याकडे जास्त लक्ष दिले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे शहरात नव्याने रस्ते तर अनेकवेळा दुरुस्ती करून रस्ते बनविण्यास प्राधान्य दिले. हे करीत असताना शहराच्या विकास आराखड्याकडे दुलक्ष्य करण्यात आले. शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सिमेंटचे रस्ते बनविले. परंतु हा निधी परत जाऊ नये म्हणून अनेक ठिकाणी विकासारखड्यानुसार रस्तारुंदीकरण न करता सिमेंटचे रस्ते बनविले. परंतु अशा कामात पालिकेच्या शहर विकास अथवा नगररचना विभागातीळ अधिकारी,अभियंता आणि संबंधित कर्मचारी यांनी हस्तक्षेप केला नाही. तर पालिकेतील बांधकाम विभागाच्या तत्कालीन शहर अभियंता आणि या विभागांतर्गत काम करणारे अभियंता यांनी देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील नागरिकांचे पैसे आणि शासनाचा निधी खर्च होऊन देखील शहरवासीयांना या सुधारणांचा योग्य लाभ मिळाला नाही. विकासाच्या नावाने निधी खर्च झाला तरी नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत. शहरात सुधारणा न झाल्याने आणि कामाचे नियोजन न झाल्याने शहरातील बकालपणा अजूनही कायम आहे,अशी तक्रार शहरातील नागरिक करीत आहेत.

गेल्या वीस वर्षांपासून शहरात विकासाच्या नावाखाली गटारे दुरुस्ती, नव्याने गटारे, फुटपाथ आणि स्वच्छता गृहे बांधणे यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र शहरातील बकालपणा कमी झाला नाही. ही कामे करताना मनपाच्या शहरविकास आणि नगररचना विभागाने हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून झालेल्या विकासकामांची चौकशी राज्याच्या नगरविकास विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी दक्ष नागरिक रामदास दानवले यांनी केली आहे.

- Advertisement -

भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने शहरात विकास कामे करताना शहराच्या विकास आराखड्यानुसार केले पाहिजेत. त्यामुळे नागरिकांपर्यंत सुविधा पोहचू शकतात आणि नागरिकांची गैरसोय दूर होते. रस्ते, गटारे आणि पदपथ नागरिकांच्या सोयीसाठी बनले पाहिजेत. ही कामे झाल्यानंतर त्याचा उपयोग नागरिकांसाठी झाला पाहिजे. सध्या मी नव्याने शहर अभियंता म्हणून महापालिकेत रुजू झालो आहे. त्यामुळे विकासकामे करताना विकास आराखड्याचा विचार केला जाईल.
– सुनील घुगे,शहर अभियंता, भिवंडी महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -