घरक्रीडावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून पाकिस्तान बाहेर, टीम इंडियाचे गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून पाकिस्तान बाहेर, टीम इंडियाचे गणित काय?

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून पाकिस्तान बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध २-० असा पराभव केला. मुलतान कसोटी सामन्यात पाकिस्तानचा इंग्लंडने २६ धावांनी पराभव केला. तसेच पाकिस्तानचा संघ ४२.४२ टक्के विजयासह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानशिवाय इंग्लंडचा संघही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे इंग्लंड संघ पाचव्या क्रमांकावर आहे. परंतु टीम इंडियाचे गणित नेमके काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ४ कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये ६ कसोटी सामन्यांमध्ये जर टीम इंडियाने २ कसोटी सामने गमावले तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून टीम इंडियाचाही पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशचा २-० असा पराभव करावा लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ किंवा ३-० अशी मालिका जिंकावी लागणार आहे.

- Advertisement -

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मालिका जिंकल्यानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर गेली आहे. येथून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा : स्मृती मंधानाने इतिहास रचला, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -