घरमहाराष्ट्र'समृद्ध जीवन'च्या गुंतवणूकदारांना बुडालेली रक्कम परत मिळणार - अँड. प्रवीण टेंभेकर

‘समृद्ध जीवन’च्या गुंतवणूकदारांना बुडालेली रक्कम परत मिळणार – अँड. प्रवीण टेंभेकर

Subscribe

राज्य शासनाने २ ऑगस्ट २०१८ रोजी अधिसूचना काढून समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या १३७ स्थावर मालमत्ता जप्त केली असून ८७५ खाते गोठवलेली आहेत. याशिवाय कंपनीचे ५१ वाहनेही जप्त केली आहेत. ही सर्व मालमत्ता विकून तसेच ८७५ खात्यावरील रक्कम एकत्र करून गुंतवणूकदारांना त्यांची बुडालेली सर्व रक्कम निश्चितपणे परत मिळेल, असे प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर लढाई लढणारे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, तसेच विधानसभेतील अपक्ष आमदार आघाडीचे सचिव, प्रविण टेंभेकर यांनी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित समृद्ध जीवनच्या सभेत बोलताना केले.


हेही वाचा – गुडविनचे गुंतवणूकदार हवालदील, थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

- Advertisement -

‘गुंतवणूकदारांनी भ्रमित होऊन योग्य प्रक्रियेपासून दूर राहू नये’

पुणे येथील समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीने फसवणूक केलेल्या हजारो पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे, यासाठी करण्यात येत असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशन तर्फे पुणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. बुडालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत असताना अँड. प्रवीण टेंभेकर यांनी लाखो गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयात तसेच सक्षम प्राधिकारी यांच्याकडे बुडालेली रक्कम परत मिळवण्यासाठी क्लेम सादर केल्याचे स्पष्ट केले आणि गुंतवणूकदारांनी भ्रमित होऊन योग्य प्रक्रियेपासून दूर राहू नये, असे आवाहन केले.


हेही वाचा – चिट फंडांना पोलिसांचा चाप!

- Advertisement -

‘कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे यावे’

बुडालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे समृद्ध जीवनचे अटकेत असणारे प्रमुख मोतेवार आणि अन्य संचालक परत करतील, असा अपप्रचार करून गुंतवणूकदारांनी कायदेशीर मार्ग अवलंबू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या भूल थापांना गुंतवणूकदारांनी बळी पडू नये आणि योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे यावे, असे स्पष्ट करून अँड प्रवीण टेंभेकर यांनी गुंतवणूकदारांना सावध केले. त्याचप्रमाणे समृद्ध जीवन मल्टीपर्पज सोसायटीचे लिक्विडेटर यांच्याकडे समृद्ध जीवनची संपत्ती पुरेशी नसल्यामुळे त्याची प्रामाणिक इच्छा असली तरीही त्याच्या माध्यमातूनही गुंतवणूकदारांना न्याय मिळणे अवघड आहे असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -