घरताज्या घडामोडीग्राहकांना नववर्षाचं मोठं गिफ्ट! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

ग्राहकांना नववर्षाचं मोठं गिफ्ट! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

Subscribe

नवीन वर्षाला आजपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये राज्य सरकारने कोरोनाच्या विषाणूवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर एलपीजी सिलिंडरच्या दराबाबत सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून १०२ रूपयांनी कमी करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता गॅस सिलिंडर १९९८.५ रूपयांना मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरानुसार चेन्नईमध्ये हा सिलिंडर २१३१ आणि मुंबईत १९४८.५० रूपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये २०७६ रूपयांना मिळेल. राज्यातील एलपीजी गॅस सिलिंडरचा एकूण दर पाहीला असता दिल्लीत आणि मुंबईत घरगुती गॅस ९०० रूपयांना मिळतो. तर पुण्यामध्ये ९०९ आणि लखनऊमध्ये ९३८ रूपये दराप्रमाणे मिळणार आहे.

- Advertisement -

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात कपात

IOCL नुसार, १ जानेवारी २०२२ पासून दिल्लीतील कमर्शिअल सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला असून १९ किलोच्या एलजीपी सिलिंडरच्या किंमतीत १०२ रूपयांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी सलग दोन महिने १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.

इंधन दराचा आढावा १ फेब्रुवारीला घेणार

१ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यात सिलिंडर १०० रुपयांनी महागला होता. आता पुढील इंधन दराचा आढावा १ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. परंतु नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्य सरकारकडून कठोर निर्बंध जारी, कोरोनामुक्त करण्याचा अजित पवारांचा नवा संकल्प


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -