घरताज्या घडामोडीUpcoming Events 2022: २०२२ असणार खास, शाहरुखची मोठ्या पडद्यावर पुनरागमन तर...

Upcoming Events 2022: २०२२ असणार खास, शाहरुखची मोठ्या पडद्यावर पुनरागमन तर आई बनणार भारती सिंह

Subscribe

अनेक प्रोजेक्ट्सवर नव्या वर्षात काम सुरू होणार आहे तर अनेक प्रोजेक्ट्स नव्या वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

चांगल्या वाईट, लहान मोठ्या घटनांमध्ये २०२१ वर्षाचा शेवट झाला. २०२१ वर्षात मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडला. अनेक सेलिब्रेटींनी सिनेक्षेत्राला अलविदा म्हटले. अनेकांच्या घरी नव्या चिमुकल्यांचे आगमन झाले. अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले तर अनेक सिनेमे पुढे ढकलण्यात आले. अनेक प्रोजेक्ट्सवर नव्या वर्षात काम सुरू होणार आहे तर अनेक प्रोजेक्ट्स नव्या वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. २०२२हे वर्ष सर्वांसाठी खास असणार आहे.

२०२२मध्ये बिग बजेट सिनेमे

  • एसएस राजामौली यांचा RRR या सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहे.
  • आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • २०२२मध्ये शाहरुख खानचा पठाण सिनेमा थिएटरमध्ये येणार आहे. पठाण सिनेमातून शाहरुख खान बॉलिवूडमध्ये पुरनागमन करणार आहे.
  • आमिर खानचा लाल सिंह चड्डा हा सिनेमा देखील २०२२मध्ये रिलीज होईल. दोन वर्षांपासून हा सिनेमा लांबणीवर पडला आहे.
  • रणवीर सिंहचे दोन सिनेमे यंदा रिलीज होण्याची शक्यता आहे. जयेशभाई जोरदार आणि सर्कस हे दोन बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांना पाहता येतील.
  • तर अभिनेता रणवीर कपूरचा शमशेरा, लव रंजन आणि ब्रम्हास्त्र सिनेमा देखील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • दीपिका पादुकोन छपाक नंतर दोन वर्षांनी गरहाइया सिनेमात दिसणार आहे.
  • अभिनेता अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा देखील रिलीज होणार आहे. बच्चन पांडे, रक्षाबंधन आणि राम सेतू या सिनेमातही अक्षय कुमार दिसणार आहे.

 

- Advertisement -

कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

  • अभिनेत्री भारती सिंह आणि हर्ष लिमांचिया यांच्याकडे गुड न्यूज आहे. एप्रिल २०२२ मध्ये भारतीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.
  • कसौटी जिंदगी की २ मधील अभिनेत्री पूजा बॅनर्जी देखील २०२२मध्ये आई होणार आहे.
  • अभिनेत्री काजल अग्रवालच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू आहे. काजलच्या घरी २०२२मध्ये बाळाचे आगमन होणार आहे.

कलाकार करणार लग्न

  • अभिनेत्री ऋचा चड्डा आणि अली फजल मार्च २०२२मध्ये लग्न करणार आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील २०२२मध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.
  • विद्युत जामवाल गर्लफ्रेंड नंदिता मेहतानीसोबत २०२२मध्ये लग्न करणार आहेत.
  • अभिनेत्री तारा सुतरिया आणि आदर जैन देखील यंदा लग्न करण्याची शक्यता आहे.

 

बिग बजेट अॅनिमेटेड सिनेमे

फेमस कार्टून आणि टॉय स्टोरी असलेला बज लाइटईयरवर अॅनिमेटेड फिल्म Lightyear सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. हॉलिवूड अभिनेता क्रिस एवान्सचा हा सिनेमा २०२२मध्ये रिलीज होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Haseen Dilruba Most Viewed Netflix: ‘हसीन दिलरुबा’चा नेटफ्लिक्सवर नवा रेकॉर्ड

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -