घरताज्या घडामोडीजवानांच्या हातात काठी कसली देता, तिथे संघाची शाखा आहे का? - हुसेन...

जवानांच्या हातात काठी कसली देता, तिथे संघाची शाखा आहे का? – हुसेन दलवाई

Subscribe

संघाच्या स्वयंसेवकांना सीमेवर पाठवा काठी घेऊन, ते सीमेची सुरक्षा करतील असा टोला दलवाई यांनी मारला.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सीमेवरच्या जवानांच्या हातात काठी कसली देता, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे का असा खोचक सवाल काँग्रेसचे नेते हुसेन दलवी यांनी केला आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. आपले २० जवान शहीद झाले आहेत यावरून हुसेन दलवाई यांनी केंद्र  सरकारवर टीका केली. आपले जवान निशस्त्र गेले होते. चीनचे सैनिकही निशस्त्र आले होते असे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात चीनी सैनिक खिळे व लोखंड बसवलेल्या काठ्या घेवून आले होते. त्या काठ्यांनी त्यांनी मारहाण केली. त्यांचा एकही सैनिक ठार झाला नाही, आपलेच जवान शहीद झाले, आपण आपल्या सैनिकांना निशस्त्रपणे कसे काय पाठवले असा प्रश्न दलवाई यांनी केला. भारतीय जवान जर ते लढले असते व काही झाले असते तर मी समजू शकतो. परंतु त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय आरएसएसची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात,  संघाच्या स्वयंसेवकांना सीमेवर पाठवा काठी घेऊन, ते सीमेची सुरक्षा करतील असा टोला दलवाई यांनी मारला.

चिन्यांनी आधीच दगडांची जमवा-जमव केली

१५ जून रोजी संध्याकाळी कमांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू चीनी सैनिकांना भारतीय क्षेत्रातून मागे हटण्याबद्दल सांगत होते. मात्र त्याआधीच चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला करण्याची पूर्वतयारी केली होती. अनेक चीनी सैनिक उंचावर उभे होते. तेथूनच त्यांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सैनिकांनीही चीनी सैनिकांना मागे हटवण्यासाठी धक्काबुक्की केली. यादरम्यान संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना अनेकवेळा शांततेने मागे हटण्यास सांगितले . पण आक्रमक झालेल्या चीनी सैनिकांनी जवानांवर बॅट, काठी व तारेने हल्ला केला. यास भारतीय सैनिकांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या झटापटीत २० जवान शहीद झाले तर ४३ चीनी सैनिक मारले गेले. या घटनेनंतर भारत व चीन यातील संबंध ताणले गेले असून चर्चेतून सीमावाद सोडवण्याची तयारी दाखवण्याचे ढोंग करणाऱ्या चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

- Advertisement -

गलवान खोरं चीनचच

भारत-चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून सातत्यानं काही कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी देशाच्या भूमिका मांडल्या. त्यावेळी चीनने दावा केला की, गलवान खोरं (Galwan Valley) हे कायमच चीनचं होतं, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -