Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र शरद पवारांशी गद्दारी करणार्‍यांना नक्कीच धडा शिकवेल; नाशिकमध्ये युवा नेत्याचे आव्हान

शरद पवारांशी गद्दारी करणार्‍यांना नक्कीच धडा शिकवेल; नाशिकमध्ये युवा नेत्याचे आव्हान

Subscribe

नाशिक : शरद पवारांनी ज्यांना ज्यांना मोठे केले तेच लोक आज स्वार्थासाठी सोडून गेले असून तीच लोक भाजपचे गुणगान गात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष आहे. आगामी निवडणूकीत जनता पवारांशी गद्दारी करणार्‍यांना नक्कीच धडा शिकवेल असे सांगून युवकांनी आता कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केले. नाशिक येथे आयोजीत एकनिष्ठ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

शहराध्यक्ष गजानन नाना शेलार व जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेत मुंबई नाका येथील कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना शेख म्हणाले, जिल्ह्याजिह्यात युवक संघटन बळकट करण्याचे काम जोरात सुरू आहे.ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला त्यांना धडा शिकविण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी युवकांच्या नेमणुका करून संघटन बळकट केले जात आहे. वीस वीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ज्यांना उपमुख्यमंत्री केले , प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी पद भोगली तेच भुजबळ आता पवारांवर टीका करू लागले आहेत असा आरोप करत आजही नाशिक जिल्हा शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करतो आहे ते बघायला मिळाले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता अन् बालेकिल्लाच कायम राहणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शादाब सैय्यद, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे , जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष संगीता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले . या मेळाव्यास शहरासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांच्या झाल्या नियुक्त्या

 • नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष : धनंजय (नाना) रहाणे
 • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको विभाग अध्यक्ष :  विजय मटाले
 • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभाग अध्यक्ष : प्रवीण नागरे
 • सिडको विभाग राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष : कृष्णा काळे
 • नाशिक शहर कार्याध्यक्ष : किरण पानकर
 • नाशिक शहर उपाध्यक्ष : नितीन पिंगळे
 • नाशिक शहर उपाध्यक्ष :नवराज रामराजे
 • शहर सरचिटणीस : फहीम सैय्यद
 • शहर सरचिटणीस : गौरव सोनवणे
 • विधानसभा अध्यक्ष मध्य : सागर बेदरकर
 • मध्य विभाग नाशिक अध्यक्ष : सलीम शेख
 • पश्चिम विभाग अध्यक्ष : गुरुदत्त दामले
 • नाशिक रोड विभाग अध्यक्ष : समाधान कोठुळे
 • सातपूर विभाग अध्यक्ष : अभिमन्यू गुडघे
 • सिडको विभाग अध्यक्ष : विक्रांत डहाळे
 • पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष : निखिल भावसार
 • पश्चिम विधानसभा अध्यक्ष : स्वप्निल दुसाने
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -