घरमहाराष्ट्रराममंदिरासाठी १ हजार वर्ष थांबायचं का - संजय राऊत

राममंदिरासाठी १ हजार वर्ष थांबायचं का – संजय राऊत

Subscribe

केंद्र सरकारने राममंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा आणि त्यासंबंधीचा अध्यादेश काढावा, अशी मागणी नुकतीच शिवसेनेने केली आहे.

अयोध्यातील राममंदिराच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वातावरणातही या मुद्द्यावरुन वादळ उठलं आहे. आतापर्यंत याच मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आता यामध्ये उडी घेतली आहे. ‘राममंदिरप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहिलो, तर १ हजार वर्ष गेली तरी राममंदिर होणार नाही’, असं वक्तव्य त्यांनी केलं. ‘उद्धव ठाकरेंच्या अयोध्या भेटीची तायारी पूर्ण झाली असून ते येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. तिथे जाऊन ठाकरे मोदजींना आणि भाजपला राममंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देतील’, असं रावते यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं. दरम्यान, राममंदिराच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी केलेलं हे वक्तव्य आता याप्रकरणाला कोणतं नवं वळण देणार? हे येणारी वेळच सांगेल.


केंद्र सरकारने राममंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा आणि त्यासंबंधीचा अध्यादेश काढावा, अशी मागणी नुकतीच शिवसेनेने केली आहे. तसंच राममंदिराच्या उभारणीमध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी केली आहे. एकंदरच २०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं आता राम मंदिराच्या मुद्याला महत्त्व येत आहे.


वाचा: राम मंदिरासाठी भूसंपादन करा – संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -