घरमहाराष्ट्रजे. जे चे अधिष्ठाता डॉ. नणंदकरांची थेट कोल्हापूरात बदली

जे. जे चे अधिष्ठाता डॉ. नणंदकरांची थेट कोल्हापूरात बदली

Subscribe

मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी पदभार सोडल्यानंतर डॉ. सुधीर नणंदकर यांना जे.जे च्या अधिष्ठातापदी नेमण्यात आलं होतं. आता डॉ. नणंदकर यांनाही जे. जे. च्या अधिष्ठाता पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. डॉ. सुधीर नणंदकर यांची बदली थेट कोल्हापूरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठाता पदावर करण्यात आली आहे. तर जे.जे. हॉस्पिटलची जबाबदारी डॉ. अजय साहेबराव चंदनवाले यांना सोपवण्यात आली आहे.

डॉ. नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता बदलीविषयी कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, बदली होण्याचा हा काळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

गेली १२ वर्ष मी रुग्ण सेवेचं काम करत आहे.‌ बदल्यांची आम्हाला सवय असते. पण, एवढ्या तात्काळ बदली पहिल्यांदाच झाली आहे. काल संध्याकाळी अचानक मला सांगण्यात आलं. मला जायचं नव्हतं. पण, अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागतो. माझी बदली कोणत्याही राजकीय दबावामुळे झालेली नाही. ‘
– डॉ. सुधीर नणंदकर, माजी अधिष्ठाता, जे.जे. हॉस्पिटल

- Advertisement -

अचानक दिलं बदलीच पत्रक

५ ऑक्टोबर २०१७ या साली जे. जे तील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. नणंदकर यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्यानंतर जे.जे. च्या अधिष्ठाता पदाचा स्वीकार केला होता. काल अचानक त्यांची बदली केल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यांच्या जागी आता डॉ. अजय साहेबराव चंदनवाले यांना हे पद देण्यात आलं असल्याच्या आशयाचं पत्रच शासनाकडून काढण्यात आलं.

- Advertisement -

काय म्हटलयं या पत्रकात

डॉ. अजय साहेबराव चंदनवाले हे पुण्याच्या बै. जी. शासकीय महाविद्यालयात कार्यरत होते. अधिष्ठातांच्या बदल्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्यं पार पाडत असताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध कायदा २००५ मधील कलम ४ (१), (३), (४) एक मधील तरतुदींचा अवलंब करून करण्यात येत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -