घरमहाराष्ट्रJalgaon : ते राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवतील; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

Jalgaon : ते राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवतील; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

Subscribe

Jalgaon : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. परिवार वादाची चर्चा नाही तर पदाची चर्चा होताना दिसत आहे. कुठलेही पद खडसे घराण्याच्या घरात गेले पाहिजे. या जर तरच्या गोष्टी असल्या तरी खडसे कुटुंब पदासाठी काहीही करू शकतं. कारण ते खडसे साहेब आहेत. ते राष्ट्रपती पदाची (President Election) निवडणूकही लढवू शकतात, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (Jalgaon He will also contest the presidential election Criticism of Chandrakant Patil on Khadse)

हेही वाचा – राजा खातोय तुपाशी अन् शेतकरी…; मंत्रिमंडळ बैठकीवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज (15 सप्टेंबर) मुक्ताईनगर येथे भव्य रॅलीचे आयोजन करत शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, खडसे कुटुंबीय काहीही करू शकतं. त्यांचा कुटुंबातील लोकांनी ग्रामपंचायत, आमदार, खासदार आणि दूध संघ निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी पीक संवर्धन निवडणूक लढवावी, ते राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढवू शकतात. कारण ते खडसे साहेब आहेत, असा चिमटा चंद्रकांत पाटील काढल्याचे पाहायला मिळाले.

आगामी काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पसंती राहणार

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी महायुतीने रक्षा खडसे किंवा अन्य कुठलाही उमेदवार उभे केले तर मी त्यांच्या समोर उभा राहिल. मात्र रक्षा खडसे लवकरच पक्षांतर करतील असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. आगामी काळात नरेंद्र मोदी यांच्यात नेतृत्वाला पसंती राहणार, असे म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या इंडियावर आघाडीवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, अनेकवेळा मोदींच्या विरोधात आघाड्या तयार केल्या गेल्या, मात्र जे त्यांचा नेता ठरू शकत नाही, ते देशाचं नेतृत्वही करू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये केंद्रात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – विखे पाटलांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनगर समाज संतप्त; राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय कुरुक्षेत्र

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बांधणी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आतापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्यामुळे सध्या जळगाव जिल्हा राजकीय कुरुक्षेत्र बनल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेना, ठाकरे गट, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार घमासान होताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे ते अधिकच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -