घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी भरचौकात दिला चोप

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी भरचौकात दिला चोप

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हेमंत दुधिया असं या तरुणाचं नाव असून, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं शिवसैनिक आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात चोप दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हेमंत दुधिया असं या तरुणाचं नाव असून, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं शिवसैनिक आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात चोप दिला आहे. जळगावातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात ही घटना घडली आहे.. या घटनेटा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये हा शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट संपल्यावर सिनेमागृहाबाहेर आला तेव्हा शिवसैनिकांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला गाठलं. त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली.

- Advertisement -

“माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यानं माफी मागितली. त्यानंतर शिवसैनिकांनी त्याला सोडून दिलं. याप्रसंगी हेमंत यांच्यासोबत असणाऱ्या उपस्थित महिलेने, “त्यांच्याकडून चूक झालीय. पण यापुढे जेव्हा जेव्हा मला सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोधात अशी पोस्ट दिसेल तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव शिवसेना शाखेत आणून देईल, त्यावर तुम्ही काय करता बघू,” असं शिवसैनिकांना सांगितलं.

या घटनेनंतर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी अशी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अशीच शिक्षा दिली जाईल. ”ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं”, असं त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

मागील ४ दिवसांपूर्वी अशीच एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीला शिवसैनिकांनी चोप दिला होता. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. याच मुद्यावरून फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत अश्लिल पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी भर चौकात चांगलाच चोपला. या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमुळे शिवसैनिक कमालीचे संतापले होते. त्यांनी या व्यक्तीचे घर गाठले आणि त्याला चौकात घेऊन आले. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी या व्यक्तीला बेदम चोप दिला.


हेही वाचा – देशातील काही राज्यांमध्ये हिंदूंना मिळणार अल्पसंख्याक दर्जा? सरकारने सुप्रीम कोर्टात दिली ही माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -