घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मध्ये २० रुपयांत ३ लिंबू; मिरची १६० रुपये किलो .

नाशिक मध्ये २० रुपयांत ३ लिंबू; मिरची १६० रुपये किलो .

Subscribe

भाजीपाल्याचे दर कडाडले; कांदे, बटाटे 20 रुपये, कोथिंबिरही महागली

नाशिक : पेट्रोलच्या दरांसोबतच भाजीपाल्याचे दरही वाढले असून, लिंबू 650 रुपये शेकडा तर, मिरची 160 रुपये किलोने बाजारात मिळत आहे. तसेच, कोथिंबिरीची जुडी २०  ते ३०   रुपयांना मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खर्च अधिक वाढला आहे.पेट्रोल ११५  रुपयांजवळ पोहोचले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने लिंबूला अधिक मागणी आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे २०  रुपयांचे तीनच लिंबू मिळतात. तर मिरची ४० रुपये पावशेर या भावाने विकली जात आहे.

या तुलनेत कांदे व बटाट्याचे दर सर्वात कमी दिसून येतात. साधारणत: 20 रुपये किलोने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. वांगे ६० रुपये किलो, काकडी १५  रुपये किलो, भोपळा २०  रुपयांना मिळत आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसते. कोथिंबिर२० ते ३०  रुपये जुडी, मेथी, पालक, शेपू या २०  रुपये जुडी प्रमाणे मिळत आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने त्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत.

- Advertisement -

द्राक्षाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने अवघे २० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. टोमॅटो ४०  रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. अन्य भाज्यांमध्ये गवारीची आवक मर्यादित असून, गेले काही दिवस ८०  रुपये किलो दराने विकली जाणारी गवार आता ६०  रुपये किलोपर्यंत घसरली आहे. शिमला मिरची ४०  रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. मार्चअखेरचा आठवडा असल्यामुळे बाजार समित्यांनी शेवटच्या आठवड्यात लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला आवक कमी होऊन दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

अंडी-चिकन दरवाढ कायम

कोरोनाकाळात पौष्टिक आहार म्हणून अंडी भरपूर प्रमाणात खाल्ली जात होती. त्यानंतर अचानकपणे अंड्यांचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. हिवाळ्यात मागणी असलेले अंडे उन्हाळ्यात कमी दराने विक्री होतात. मात्र, मार्चअखेर आला तरी अंडी ७० रुपये डझन आहेत. तर चिकन २२० रुपये किलो आहे. मटण सातशे रुपयांपर्यंत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -