घरमहाराष्ट्रराणेंसारख्या बेईमानी नेत्याला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही - विनायक राऊत

राणेंसारख्या बेईमानी नेत्याला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही – विनायक राऊत

Subscribe

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे १९ ऑगस्ट पासून मुंबईतून जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ करणार आहेत. यावेळी नारायण राणे दादर येथील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. नारायण राणेंसारख्या बेईमानी नेत्याला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही असा घणाघात करत राणे यांना शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्यापासून रोखतील, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

शिवसेनेचा नारायण राणे यांच्या स्मृतिस्थळी भेट देण्याला विरोध असून स्मृतिस्थळी भेट देण्यास शिवसैनिक रोखतील. नारायण राणें सारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणें सारखा बाटगा आणि बाळासाहेबांशी बेईमान महाराष्टात दूसरा नेता नाही. त्यामुळे अश्या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट घेऊ देणार नाहीत असा इशारा खासदार विनायक राऊत यानी दिला आहे.

- Advertisement -

नारायण राणे १९ ऑगस्ट पासून “जन आशीर्वाद” यात्रेला प्रारंभ करणार आहेत. १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट पर्यंत चालणारी ही यात्रा सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -