घरताज्या घडामोडीपुण्यतिथी विशेष : चीनने धोका दिल्यावर खचले जवाहरलाल नेहरू, राजीनाम्याचीही तयारी केली...

पुण्यतिथी विशेष : चीनने धोका दिल्यावर खचले जवाहरलाल नेहरू, राजीनाम्याचीही तयारी केली होती

Subscribe

प्रकृती चिंताजनक असतानाही जवाहरलाल नेहरु बरे होण्याचे देत होते आश्वासन

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज गुरुवार (२७मे) पुण्यतिथी आहे. नेहरुंचे १९६४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. देशासाठी आणि नेहरुंसाठी १९६४ हे वर्ष वाईट निघाले होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतही नेहरुन आपल्या परिवारातील लोकांना आपण लवकर बरे होऊ असे आश्वासित करत होते. ते फार शांत स्वभावाचे आणि कष्टकरी होते. आपल्या तब्येतीमुळे कामात अडथळा येऊ नये असा प्रयत्न नेहरु करायचे परंतु ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच चालली होती. चीनने धोका दिल्याने नेहरु खचले होते त्यानंतर जागतिक पातळीवरील नेते आणि सोवियत युनियनमुळेही नाराज झाले होते.

चीनच्या धोक्यामुळे नेहरु नाराज

पंडित जवाहरलाल नेहरु चीनने धोका दिल्यामुळे नाराज होते. धोक्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता यामुळे त्यांचा स्वभावही शांत शांत झाला होता. तेव्हापासून नेहरुंची प्रकृती ढासळली त्यानंतर पुन्हा बरे झाले नाही. असे सांगितले जाते की, १९६२ मध्ये नेहरुंना चीनने धोका दिल्यानंतर त्यांच्यातील उत्साह कमी झाला होता. चीननंचर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोवियत युनियन आणि जागतिक पातळीवरील नेत्यांकडूनही नाराजी मिळाली होती. नेहरुंचा स्वभाव शांत झाला त्यांनी आपला राजीनामा देण्याचीही तयारी केली होती. सतात आनंदी असणारे नेहरु चीनसोबत झालेल्या युद्धानंतर शांत आणि गंभीर झाले होते.

- Advertisement -

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या २ वर्षाच्या अंतिम कार्यकाळात देशासाठी आणि देशातील जवानांसाठी चांगली कामे केली. जागतिक पातळीवरही मजबूतीने काम केले आहे. परंतु त्या काळात नेहरुंच्या चेहऱ्यावर पुर्वीसारखे तेज आणि उत्साह नव्हता असे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले आहे. १९६४ मध्ये नेहरुंच्या तब्येत अजूनच बिघडली होती यामुळे त्यांना आता विश्रांती घेण्याची गरज होती. नेहरु ४ दिवसांच्या विश्रांतीसाठी देहरादूनला गेले होते परंतु याचा म्हणावा तसा फायदा झाला नव्हता त्यांची तब्येत काही सुधारली नव्हती. २६ मे रोजी ते पुन्हा परतले तेव्हा त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती.

२६ मे ची शेवटची रात्रा

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी २६ मे च्या सायंकाळी देहरादून ते दिल्ली असा शेवटचा प्रवास केला होता. देहरादूनवरुन जेव्हा नेहरु दिल्लीकडे रवाना झाले तेव्हा त्यांना सोडण्यासाठी थोड्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. त्या संध्याकाळी नेहरुन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आणि तोच त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. जेव्हा नेहरुंनी हेलिकॉप्टरजवळ उभे असताना हात मिळवला तेव्हा समोरच्या व्यक्तीने न्याहाळले की नेहरुंना हात उचलताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत असल्याचे हवभाव पाहिले. त्यांची कन्या इंदिरा सहारा देण्यासाठी उभी होती. नेहरुंना हालचाल करण्यासही समस्या जाणवत होत्या.

- Advertisement -

शेवटच्या रात्री नेहरु अस्वस्थ

नेहरुंना २६ मे १९६४च्या रात्री खुप थकल्यासारखे वाटत होते नेहमीच्या दिनक्रमापेक्षा लवकर झोपण्यासाठी गेले. त्यांची रात्र बेचैनीची गेली. रात्रभर ते पाठ आणि खांदे दुःखत असल्याचे सांगत होते त्यांना औषध देऊन झोपवण्याचा प्रयत्न नाथुराम करत होते. २७ मे सकाळी ६.३० वाजता नेहरुंना पैरालिटिक झटका आला आणि त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये ते निपचित पडले. इंदिरा गांधींनी लगेच डॉक्टरांना फोन केला. तीन डॉक्टरांचे पथक लगेच पोहचले डॉक्टरांनी नेहरुंना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले परंतु ते कोमामध्ये गेले होते. शरीराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक प्रयत्नांनंतर नेहरुंकडून काही प्रतिसाद न मिळाल्यानं डॉक्टरांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास नेहरुंची निधनाच घोषणा केली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -