घरमहाराष्ट्रएकदा 'अशीही बनवा बनवी'ही पाहाच, जयंत पाटलांचा इस्त्राईलच्या अधिकाऱ्याला सल्ला

एकदा ‘अशीही बनवा बनवी’ही पाहाच, जयंत पाटलांचा इस्त्राईलच्या अधिकाऱ्याला सल्ला

Subscribe

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हसमुख स्वभावाचे आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणारे म्हणून सर्वांना ओळखीचे आहेत. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. जयंत पाटील यांना हिंदी चित्रपट पाहण्याचा सल्ला देणाऱ्या इस्त्राईलच्या अधिकाऱ्याला ‘अशीही बनवा बनवी’ हा मराठी चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

जगभरातील लोकांचे भारतीय सिनेसृष्टीवर असलेले प्रेम काही नवे नाही. भारतीय सिनेसृष्टीवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला सापडेलच. अशाच भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.

- Advertisement -

कामानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी यांनी जयंतराव पाटलांना भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगताच जयंतराव पाटलांनी त्यांना काही चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलाच. शिवाय दिलखुलास स्वभाव असणार्‍या जयंतराव पाटील यांनी यावर दाद दिली नाहीत तर ते जयंतराव कसले ! जयंतरावांनी कोबी यांना ‘अशीही बनवाबनवी’ हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला देतानाच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचेही नमूद केले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -