घरमहाराष्ट्रकेंद्राच्या बोगस पॅकेजमुळे फडणवीसांची राज्याकडे आर्थिक पॅकेजची मागणी - जयंत पाटील

केंद्राच्या बोगस पॅकेजमुळे फडणवीसांची राज्याकडे आर्थिक पॅकेजची मागणी – जयंत पाटील

Subscribe

देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक पॅकेजच्या मागणीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

कोरोना विषाणूचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं ठपका ठेवत भाजपने आज राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. मात्र राज्यातील सरकार योग्य काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु आहेत, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. शिवाय, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

राज्य सरकार चांगलं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं. मग त्यांना कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त टेस्टिंग सुरु आहेत म्हणून जास्त रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहेत म्हणून त्यांच्या इथे रुग्ण कमी आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

केंद्रा सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवाय, राज्य सरकारने राज्यातील जनतेला दमडीही दिली नाही, अशी टीका केली आहे. यावर जयंत पाटील उत्तर देताना म्हणाले की, “केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत.” केंद्र सरकारने राज्याला पैसे दिले आहेत याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे, अशी कोपरखळी देखील जयंत पाटील यांनी लगावली.


हेही वाचा – नुकसान १ लाख कोटींचं, मदत फक्त १ हजार कोटींची; मदत पॅकेजवर ममता बॅनर्जी नाराज

- Advertisement -

पंतप्रधान तरी कुठे बाहेर गेले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे बाहेर काम करायला गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा हे ऐकतील, असा विश्वास आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -