घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : ज्वेलर्स व कापडांची दुकाने बंद राहणार - राज्य सरकार

करोना व्हायरस : ज्वेलर्स व कापडांची दुकाने बंद राहणार – राज्य सरकार

Subscribe

पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांची दुकाने बंद ठेवण्याचे सांगण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, दुकाने, बाजारपेठा, सिनेमागृहे, मॉल्स इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता यापाठोपाठ पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांची दुकाने बंद ठेवण्याचे सांगण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत राज्यात ८०० रुग्णांपैकी ४२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय उपचार सुरू असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून आणखी रिपोर्ट येणे बाकी असल्याचे टोपे यांनी सांगितले. करोना हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे. संशयित रुग्णांसोबत दुजाभाव करु नये, असेही आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

clothes
कपडे

राजेश टोपे म्हणाले की, परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये लक्षणं दिसून आली, तरच टेस्ट केली जाणार आहे. करोना पसरू नये म्हणून आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एनआयव्हीला भेट देणार असून अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी पत्रकारांना सोबत नेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वर्क फॉर्म होमला प्राधान्य देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी घरुन काम करा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरुन सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -