घरमहाराष्ट्रआठवलेसाहेब तुमच्यातला लढवय्या भीमसैनिक कुठे हरवला? जितेंद्र आव्हाडांचा खरमरीत सवाल

आठवलेसाहेब तुमच्यातला लढवय्या भीमसैनिक कुठे हरवला? जितेंद्र आव्हाडांचा खरमरीत सवाल

Subscribe

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रामदास आठवलेंवर जहरी टीका केलीय. आठवलेसाहेब तुमच्यातला लढवय्या भीमसैनिक कुठे हरवला? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

रामदास आठवले नागपुरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आठवलेंनी हे धक्कादायक विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर खळबळ माजली आहे. त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जातेय. तसंच, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रामदास आठवलेंवर टीका केली.

- Advertisement -

आठबले साहेब तुमच्यातला लढवय्या भीम सैनिक कुठे हरवला? बाबासाहबांचे तत्वज्ञान इतके तकलादू नव्हते. वाईट वाटते पण कीवपण येते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.


रामदास आठवले नक्की काय म्हणाले?

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. ते आंबेडकरांचा फोटोही वापरतात. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाहीत. पन्नास खोक, एकदम ओके म्हणणारे आहेत बोके त्यांना नाही डोके…” अशी कविता सांगत आठवलेंनी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली, असंही रामदास आठवले म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -