घरमहाराष्ट्रकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा राज्यस्तरीय मूकमोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा राज्यस्तरीय मूकमोर्चा

Subscribe

३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर "मूक मोर्चे" काढण्यात येणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्य शासनाने संघटनेस दिलेले लिखित आश्वासन न पाळल्यामुळे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध टप्प्यांत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात दि.३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर “मूक मोर्चे” काढण्यात येणार आहेत व त्यांच्या मार्फत तसेच सर्व विभागीय मंडळ(बोर्ड) अध्यक्षांमार्फत शासनास निवेदन देण्यात येईल. मुंबई विभागात वाशी स्टेशन(पूर्व),नवी मुंबई येथून एच. एस्सी .बोर्डाच्या कार्यालयावर दु.१:०० वा. मोर्चा काढण्यात येईल.

काळ्या फिती लावून काढणार मूक मोर्चा

३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काळ्या फिती लावून “मूक मोर्चे” काढून आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही शासनास जाग आली नाही तर गांधीजींच्याच मार्गाने १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात “असहकार आंदोलन ” करण्यात येईल आणि हे आंदोलन शासनानेच लादलेले असेल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल.राज्यातील सुमारे १६ लाख १२ वी चे विद्यार्थी व ७२ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा असे संघटनेने आवाहन केले आहे.

- Advertisement -

काय आहेत मागण्या

पुढील प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनास दिले आहे.
१)सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२)मूल्यांकनास पात्र सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून त्यांना अनुदान द्यावे.
३)महिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे.
४)२०११-१२ पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देणे.
५)विद्यार्थी हितासाठी विज्ञान व गणिताचे पूर्वी प्रमाणेच भाग-१ व भाग-२ असे स्वतंत्र पेपर घेण्यात यावे तसेच नीट व जे ई ई परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असावे.
६)महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची MHT-CET परीक्षा ऑफलाईन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी घ्यावी.
७)अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या तीन फेऱ्या अनुदानित कॉलेजच्याच कराव्या. अशा ३४ मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -