घरदेश-विदेशलाकडी पलंगामध्ये आढळला गर्भवती महिलेचा मृतदेह

लाकडी पलंगामध्ये आढळला गर्भवती महिलेचा मृतदेह

Subscribe

बिहार येथील गया परिसरात लाकडी पलंगामध्ये गरोदर महिलेचा मृतदेह आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चारित्र्यावरील संक्षयावरून पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहत्या घरातील लाकडी पलंगामध्ये एका गरोदर महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेच्या पतीने तिची हत्या करून मृतदेह पलंगात लपवला होता. काही दिवसांनी मृतदेहाचा वास आल्यानंतर पलंग उघडण्यात आला. पलंग उघडल्यावर आत मृतदेह असल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह बबीता (२५) या मुलीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बबीताच्या पतीने तिचा खून करून मृतदेब पलंगात लपवला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेपासून बबीताचा पती राजेश हा बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कसा उघडकीस आला हा प्रकार

गुरुग्राम येथील जल विहार कॉलनीतील सेक्टर ४६ मध्ये दिनेश कुमार यांनी एक घर भाड्याने घेतले होते. दिनेश कुमार यांचा चहाचा व्यवसाय आहे. दिनेश कुमार यांनी हे घर राजेशकडून भाड्याने घेतले. या घरात एक लाकडी पलंग होता ज्यात एक मोठा कप्पा होता. राजेशने या कप्प्यात आपला पत्नीचा मृतदेह लपवून ठेवला होता. दिनेश कुमार या पलंगावर झोपत होते. मागील चार दिवसांपासून हा मृतदेह पलंगात लपवला होता. मात्र यानंतर त्याचा वास आल्यामुळे दिनेश कुमार यांनी पलंग उघडला तर तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

चारित्र्यावर संक्षयामुळे केली हत्या

दिनेश बबीताच्या चारित्र्यावर संक्षय करत असल्याची माहिती बबीताच्या वडिलांनी दिली आहे.”दिनेश हा बबीताशी अनेकदा भांडत असे. तिच्या चारित्र्यावर संक्षय असल्यामुळे अनेकदा त्यांच्यात भांडणे होत असत. एकदा त्याने रागाच्या भरात तिचे सिमकार्ड तोडले होते.” असे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -