घरमहाराष्ट्रनागपूरात कालिदास महोत्सवाचा श्रीगणेश

नागपूरात कालिदास महोत्सवाचा श्रीगणेश

Subscribe

नागपूरात कालिदास महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला विविध सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

देशातील पहिला महिलांचा वाद्यवृंद असलेल्या अनुराधा पाल यांच्या ‘स्त्री शक्ति’ वाद्यवृंदाने कालीदास समारोहाच्या उद्घाटनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या तबला वादनाला मिळणारी दाद कालीदास महोत्सव हा खऱ्या अर्थाने नागपूरची ओळख झाल्याची पावती देत होता. सुरेश भट सभागृहात कालीदास समारोह आयोजन समिती, पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सहयोगाने आयोजित कालीदास समारोहात आज रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. या समारोहाचे उद्घाटनाला महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार सुधाकर कोहळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मुकेश चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त सुधाकर तेलंग, के. एन. के. राव, संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आदी उपस्थित होते.

महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती माडखोलकर आणि संच यांनी ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ वर आधारित शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांना यावेळी श्रीमती राजेश्वरी अय्यर, शिवप्रसाद, शिरीष भालेकर, बकुल सावदे, के. व्यंकटेश्वरन यांनी साथ दिली तर श्रीमती अनुराधा पाल यांच्या ‘स्त्री शक्ति’ताल वाद्यवृंद ने रसिकांना रिझविले. सुरुवातीला नारी शक्ति गिताची विशेष प्रस्तुती त्यांनी केली. त्यानंतर उत्तम अशा ताल वाद्यवृंद श्रवणीय पर्वनी ने रसिक न्हाऊन निघाले. त्यांना रम्या घटकर, श्वाईनी दत्ता, यु. नागमणी, चारु हरिहरन् यांनी साथ दिली. त्यांच्या सादरीकरणाचा शेवट सारे जहां से अच्छा या गिताच्या ताल वादनाने झाला. कार्यक्रमाच्या समारोपाला शास्त्रीय गायनाच्या अनुभुतीने आरती अंकलीकर यांनी रसिकांना खऱ्या अर्थाने श्रीमंत केले. आरती अंकलीकर यांच्या गायनात संवादिनीला तन्मय देवचट्टे, तबल्याला वि. भ. खांडोलकर, पखवाज ला सुरज तर शिष्या अबोली व सरगम यांनी साथ दिली. राग दुर्गातील सखी मोरे रुमझूम ही बंदीश त्यांनी पेश केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

- Advertisement -

“खंड पडलेल्या कालीदास समारोहाच्या पूनर्जिवनाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली. कालीदास समारोहातील कार्यक्रमांचे आयोजन हे उच्च अभिरुचिंना प्रोत्साहन देणारे आहे.” – जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

“संगीतातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी कालीदास महोत्सवाचे आयोजन आहे. खऱ्या संगीत प्रेमींसाठी विनाशुल्क अशी सांस्कृतिक मेजवानी या समारोहात राहील व रसिकांचा प्रतिसाद पाहता दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.”- विभागीय आयुक्त, डॉ. संजीव कुमार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -