घरदेश-विदेशबडगाम चकमक: पत्रकार बुखारींच्या हत्येचा मास्टरमाइंड नावेद जट ठार

बडगाम चकमक: पत्रकार बुखारींच्या हत्येचा मास्टरमाइंड नावेद जट ठार

Subscribe

पत्रकार शुजान बुखारी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कैदेतून फरार झालेला दहशतवादी नावेद जट याला त्याच्या साथिदारासोबत ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. पत्रकार शुजान बुखारी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कैदेतून फरार झालेला दहशतवादी नावेद जट याला त्याच्या साथिदारासोबत ठार करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान चकमक सुरु आहे. चकमक सुरु असलेल्या घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. या दगडफेकीमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.

- Advertisement -

दहशतवाद्यांनी कार केली होती हायजॅक

यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी ४ दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यामधून एक काळ्या रंगाची आल्टो कार हाईजैक केली होती. त्यानंतर हे दहशतवादी श्रीनगरच्या लालचौकवरुन जवळपास ४ किलोमीटरवर असलेल्या रामबाग येथे रात्री उतरले. कारमधून दहशतवादी उतरल्यानंतर कार चालकाने जवळच्या पोलीस ठाण्यात या सर्व प्रकरणाची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी आणि जवानांनी आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवून सर्च ऑपरेशन सुरु केले.

- Advertisement -

पत्रकार शुजान बुखारी यांची हत्या

श्रीनगरमध्ये बाईकवरुन आलेल्या तीन दहशतवाद्यांनी पत्रकार शुजान बुखारी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. दरम्यान बुखारी यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचा देखील मृत्यू झाला होता. या हत्याप्रकरणात काश्मीर हॉस्पिटलमधून फरार झालेला दहशतवादी नवीद जटचा हात असल्याचे मानले जात होते. या हल्ल्याचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये बाईकवर मध्ये बसलेला दहशतवादी नवीन जट होता असे सांगितले जात होते.

दोन आठवड्यात २० दहशतवादी ठार

गेल्या दोन आठवड्यांमध्ये जवानांनी २० दहशतवाद्यांना ठार केले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी संगठना लष्कर-ए-तोएबा आणि हिजबुज मुजाहिद्दीनचे टॉप कमांडर देखील सहभागी होते. यापूर्वी मगंळवारी कुलगाव आणि पुलवामामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली होती. या चकमकीत जवानांना ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते.

हेही वाचा – 

जम्मू-काश्मीरमध्ये चकमीत एक जावन शहिद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनागमध्ये चकमक; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू – काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

जम्मू – काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; लान्स नायक शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -