घरमहाराष्ट्रकल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत सेना-भाजपमध्ये युतीचे संकेत?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत सेना-भाजपमध्ये युतीचे संकेत?

Subscribe

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पण सकारात्मक प्रतिसाद

प्रजासत्ताक दिनी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे न बोलावता भाजपच्या कार्यक्रमात पोहचल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी २६ जानेवारीला केलेल्या भाषणात सोशल डिस्टसिंग ठेवा, मात्र मनात डिस्टन्स ठेवू नका असं आवाहन भाजप नेत्यांना केलं होतं. श्रीकांत शिंदेच्या या वक्तव्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पण सकारात्मक प्रतिसाद आला आहे. यामुळे आता येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा युती होते का? याची चर्चा रंगू लागली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घटनांवरुन तसे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार अशी घोषणा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा केली आहे. दुसरीकडे भाजप मनसेची युती होणार अशीही चर्चा शहरात रंगली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता शहरात पुन्हा भाजप-सेना नेत्यांची दिलजमाई होताना दिसत आहे.

शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे २६ जानेवारी रोजी न बोलावता भाजपच्या कार्यक्रमात पोहचले होते. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणाची प्रचंड चर्चा सुरु आहे. सोशल डिस्टसिंग ठेवा, मात्र मनात डिस्टन्स ठेवू नका असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेत्यांना केलं होतं. आता याला उत्तर देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांचं समर्थन केलं आहे. गणपत गायकवाड यांनी सांगितलं की ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील. शहर चांगलं होऊ शकतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढत चालली आहे का असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना-भाजप हे भले परस्पर विरोधी लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कल्याण डोंबिवलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यांवरून शिवसेनेला टोला हाणला होता. याला शिवसेनेने कोणतेही उत्तर दिलेलं नाही तर भाजपच्या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्स असले तरी मनातील डिस्टन्स वाढवू नका असं सांगत आपल्यात दुरावा अद्याप झालेला नाही आहे हे दाखवून दिलं. तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील. शहर चांगलं होऊ शकतं. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर युती होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -