घरमहाराष्ट्र'त्या' शहीद जवानांच्या वारसांना पालिकेत नोकरी

‘त्या’ शहीद जवानांच्या वारसांना पालिकेत नोकरी

Subscribe

कल्याणच्या चक्की नाका येथील भीमाशंकर मंदिर परिसरातील विहिर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. या शहीद जवानांच्या वारसांना तत्काळ पालिका सेवेत नोकरी देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी महासभेत घेण्यात आला आहे.

कल्याणच्या चक्की नाका येथील भीमाशंकर मंदिर परिसरातील विहिर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. या तीनही सफाई कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन जवान विहिरीत उतरले होते. परंतु, विहिरीतल्या दुर्गंधामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या जवानांचे नाव प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार असे आहे. मृत्यूनंतर त्यांची कुंटुंब उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे या शहीद जवानांच्या वारसांना तत्काळ पालिका सेवेत नोकरी देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी महासभेत घेण्यात आला आहे.

हेही वाचा – कल्याणच्या नेतीवलीमध्ये विहरीत पडून चार जणांचा मृत्यू

- Advertisement -

घटनेच्या चौकशीसाठी विभागीय दंडाधिकारींची समिती

बुधवारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेत या घटनेवर चर्चा झाली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच अग्निशमन जवानांचा प्राण गेल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यानंतर महापौर विनिता राणे यांनी आयुक्त गोविंद बोडक यांना निवेदन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बोडके यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय दंडाधिकारी यांची समिती नेमल्याचे सांगितले. त्यांचा अहवाल आल्यावर दोषारोप सिद्ध केले जातील. दरम्यान, शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना तत्काळ सेवेत रुझू करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे बोडके यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये हॉस्पिटलचा असंवेदनशीलपण, ४ वर्षीय बाळाचा मृत्यू!

- Advertisement -

सहकाऱ्यांचा मदतीचा हात

अग्निशमन दलाच्या शहिद झालेले जवान प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार यांच्या कुटुंबांना पालिकेतील त्यांचे सहकारी मित्र मदत करणार आहेत. पालिकेचे अधिकारी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक हजार तर कर्मचारी ५०० रुपये मदत म्हणून देणार आहेत. सर्व नगरसेवक दोन्ही कुटुंबांना एक महिन्याचा पगार देणार आहेत. त्याचबरोबर या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा मिळावा यासाठी पालिकेचा पाठपुरावा सुरु आहे.


हेही वाचा – कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक दिवाळखोरीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -