घरठाणेफुटीरांचा वैचारिक गोंधळ उडालाय, मातोश्रीविरोधात बोलणाऱ्यांना केदार दिघेंनी सुनावले

फुटीरांचा वैचारिक गोंधळ उडालाय, मातोश्रीविरोधात बोलणाऱ्यांना केदार दिघेंनी सुनावले

Subscribe

शिवसैनिक बाळासाहेबांचे वास्तव्य राहिलेल्या मातोश्रीवर कधीच टीका करत नाहीत...आम्हीच खरे म्हणणारे मातोश्रीवर पण टीका करू लागले... फुटीरांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे, असं केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे.

ठाणे – पावसाळी अधिवेशनपूर्वी आज भाजप- शिंदे गटाच्या आमदारांच्या घोषणा लक्ष्यवेधी ठरल्या. या घोषणांतून त्यांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. “कोविडच्या भितीने राजा बसला घरी… हवालदिल जनता फिरली दारोदारी… युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी… भ्रष्टाचाराचे खोके पोहचले यांच्या घरोघरी..” अशा आशयाचे बॅनर झळकवत घोषणाबाजी केली. यावरून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसैनिक बाळासाहेबांचे वास्तव्य राहिलेल्या मातोश्रीवर कधीच टीका करत नाहीत…आम्हीच खरे म्हणणारे मातोश्रीवर पण टीका करू लागले… फुटीरांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे, असं केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे.

हेही वाचा – बीएमसीचे खोके, मातोश्री ओके; भाजप -शिंदे गटाची ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

- Advertisement -

केदार दिघे ट्विटमध्ये म्हणाले की, “फुटीर आमदार मातोश्रीवर टीका करू लागले आहेत. जे मातोश्रीवर टीका करतात ते शिवसैनिक असू शकत नाहीत. जे कालपर्यंत शिवसेनेत होते ते आज मातोश्रीवर आरोप करू लागले आहेत. कोविडच्या काळात राजा घरात होता असा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला. माझे त्यांना सांगणे आहे, कोविडच्या काळात देशाचा राजा पण घरातच होता. आणि हजारो मैल चालत जाणाऱ्या मजुरांना कोणतीही मदत न करता, अचानक लॉकडाऊन लावून लोकांचे हाल बघत होता. याउलट महाराष्ट्राच्या राजाने गोरगरिबांची सोय केली, सामान्य नागरिकांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. शिवसैनिक बाळासाहेबांच्या पवित्र मातोश्रीवर कधीच टीका करत नाहीत. भाजपमध्ये असणारेच मातोश्रीवर टीका करतात.”


पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. आजच्या पाचव्या दिवशीही विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, संतापलेल्या सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांविरोधात घोषणाबाजी करून विधानभवन दणाणून सोडला. भाजप -शिंदे गटाने बीएमसीचे खोके, मातोश्री ओके, महापालिका स्टँडिंग कमिटीचे खोके, मातोश्री ओके, लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके… अशी घोषणाबाजी केली. याविरोधात केदार दिघे यांनी ट्विट केले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -