घरमनोरंजन"उंच माझा झोका" पुरस्काराच्या 'या' आहेत मानकरी

“उंच माझा झोका” पुरस्काराच्या ‘या’ आहेत मानकरी

Subscribe

समाजातील विविध विषय घेऊन कार्यक्रम सादर केले जातात किंवा अतुलनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. म्ह्णूनच या वर्षी सुद्धा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळा २०२२ या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

झी मराठी(zee marathi) वाहिनीवर नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. यावर्षी देखील असाच एक दर्जेदार पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी ‘उंच माझा झोका'(unch majha jhoka award show) हा पुरस्कार सोहळा होणार आहे. ‘मला अभिमान आहे'(mala abhiman ahe) हे ब्रीदवाक्य घेऊन ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार सोहळा दिमाखात होणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. झी मराठी वाहिनीवर नेहमीच समाजातील विविध विषय घेऊन कार्यक्रम सादर केले जातात किंवा अतुलनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. म्ह्णूनच या वर्षी सुद्धा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळा २०२२ या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(pankaja munde) या पुरस्कार सोहळ्याचं निवेदन करताना दिसणार आहेत. तर अभिनेत्री क्रांती रेडकर(marathi actress kranti redkar) सुद्धा पंकजा मुंडे यांच्या सोबत निवेदन करणार आहेत.

हे ही वाचा – पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

- Advertisement -

आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ह्या वर्षीचा हा सन्मान पुरस्कार विजत्या आहेत उद्योजिका – डॉ.वैजयंती पंडित आणि श्रीमती शीला धारिया ह्या सुप्रसिद्ध उद्योजिका असून त्यांनी आपापल्या श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मूक बधिरांच्या कल्याणासाठी “संवाद कर्णबधीर प्रभोधिनी” शाळेच्या संस्थापिका श्रीमती अपर्णा अगाशे, पर्यावरण आणि सौरऊर्जा यावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ.विनिता आपटे, डॉ. प्राजक्ता दांडेकर या शास्त्रज्ञ असून पशु विषयी त्यांना कणव असल्या मूळे कृत्रिम शरीर तयार करण्या विषयी त्यांचे संशोधन चालू आहे, सौ. ममता भांगरे यांनी शेती विषयी आधुनिक तंत्र वापरून शेती मध्ये त्यांनी अनेक कामे केली आहेत आणि श्रीमती मीनाक्षी निकम यांनी अपंग महिलांना सक्षम करण्यासाठी ‘स्वयंदीप’ ह्या संस्थाची स्थापन केलेली आहे, ऍथलेटिक्स मध्ये प्राविण्य मिळवून अनेक स्पर्धा यशस्वीरित्या गाजवणाऱ्या श्रीमती संजीवनी जाधव या सर्व आदरणीय महिला या पुरस्काराच्या मानकरी आहेत .

हे ही वाचा – अभिनेते परीक्षित सहानींच्या जीवनावर ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तक लवकरच होणार प्रकाशित

- Advertisement -

सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहेत. रविवारी 28 ऑगस्ट 2022 संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हे ही वाचा –  ‘ड्रामा गर्ल’ राखी सावंतची मेंढ्यांच्या कळपांत नौटंकी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -